करमाड : पोलिसांनी सय्यदपूर येथे मंगळवारी जुगार अड्डयावर धाड टाकून सहा जणांना अटक केली. तसेच ६ हजार ५०० रुपयांसह जुगाराचे साहित्य जप्त केले.
पोलिसांनी सय्यदपूर शिवारातील गोवर्धन गवारे यांच्या शेतातील लिंबाच्या झाडाखाली झन्ना-मन्ना नावाचा जुगार सुरु असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी छापा टाकून ६ हजार ६०० रुपयांची रोकड व जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी भाऊसाहेब श्रावण शेळके, रामसिंग भावसिंग बारवाल, बाबासाहेब भानुदास द्वारकुंडे, परशुराम रावसाहेब मखरे, मुश्ताक मस्तान शेख यांच्याविरुद्ध करमाड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.