पूर्वी लग्नपत्रिकेचे महत्त्व असायचे. पत्रिकेत भावकीतील कुणाचे नाव छापावे व कुणाचे छापू नये यावर बरीच खलबते व्हायची. त्यातून मानापमान व रुसवे-फुगवेही घडत असत. सध्याच्या कोरोनाच्या महामारीत ना फटाक्यांची आतिषबाजी, ना वरात,ना वाजंत्री मंडळी, ना पाहुणे मंडळींची उठबैस. कोरोनामुळे लग्नपत्रिकेचा व्यवसाय तोट्यात गेल्याचे मत शहरातील प्रिंटिंग प्रेसचालकांनी व्यक्त केले. आकर्षक, महागडी व मनात भरणाऱ्या लग्नपत्रिका छापण्यावर पूर्वी विशेष भर असायचा. परंतु प्रिंटेड लग्नपत्रिकेची परंपरा कोरोनामुळे नामशेष होते की काय अशी भीती वाटत आहे. आता सोशल मीडियावरच आकर्षक पद्धतीने व्हिडीओ एडिट करून निमंत्रण पत्रिका बनवून पाठवण्याचे प्रमाण वाढले असल्याने लग्नपत्रिका छपाईचा रोजगार जरी बुडाला असला तरी वेळ आणि इंधनाची मात्र खूप मोठी बचत होत आहे, हे नाकारून चालणार नाही.
प्रिंटेड लग्नपत्रिका ठरताहेत कालबाह्य, व्हॉट्सॲपवरच निमंत्रणाचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 09, 2021 4:04 AM