जिल्हा मध्यवर्ती बॅंकेच्या आळंद शाखेतील नियमित कर्ज अेडणाऱ्या ग्राहकांना २० टक्के वाढीव कर्ज योजनेचा शुभारंभ करण्यात आला. याप्रसंगी सिरसाठ बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पं. स. माजी सभापती सर्जेराव मेटे, उपनगराध्यक्ष गजानन नागरे, जातवा गावाचे उपसरपंच तान्हाजी पवार, सताळ्याचे सरपंच शेख फारुख यांची उपस्थिती होती. आळंद शाखेत २५३० चालू थकबाकीदार सभासद आहेत. त्यापैकी १३४० सभासदांना या वाढीव कर्जाचे वितरण करण्यात आले. यावेळी माजी सरपंच सुनील तायडे, नायगव्हाण सेवा संस्थेचे अध्यक्ष मिठू दाढे, शेख अब्दुल्ला, गणेश खमाट, अजिनाथ पायगव्हान, संजय फसाटे, कर्ज वितरण अधिकारी ए. ओ. कोलते आदींची उपस्थिती होती.
---
कर्मचारी भरती, इमारतीसाठी निधी देण्याची मागणी
आळंद येथील जिल्हा बॅंकेच्या शाखेअंतर्गत दहा ते बारा गावातील सहकारी संस्था अवलंबून आहेत. या ठिकाणी कायम ग्राहकांची गर्दी असते. त्या तुलनेत कर्मचारी संख्या कमी आहे. त्यामुळे ग्राहकांची गैरसोय होत असल्याने येथे कर्मचारी भरती करण्यात यावी. तसेच मोडकळीस आलेली इमारतीची दुरुस्तीसाठी निधी देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली.
120821\20210812_135403.jpg
फोटो ओळ:आळंद(ता.फुलंब्री)येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सभासद कर्जवाटप प्रसंगी मार्गदर्शन करताना संचालक सुहास सिरसाठ.