औरंगाबाद : कोरोनाच्या दिवसेंदिवस वाढत्या विळख्याने शहरातील शासकीय रुग्णालयांबरोबर खाजगी आणि महापालिकेच्या कोविड केअर सेंटरमधील खाटा रुग्णांनी भरून गेल्या आहे. खाटांसाठी रुग्णांना अक्षरश: भटकंती करावी लागत आहे. कोरोनाचा अहवाल पाॅझिटिव्ह आलेले रुग्ण महापालिकेचे केंद्र गाठत आहेत: परंतु जागा नाही, सकाळपर्यंत घरी राहण्याचा अजब सल्ला रुग्णांना दिला जात आहे.
शहरातील अनेक खाजगी रुग्णालयांत एकही खाट शिल्लक नसल्याची परिस्थिती आहे, तर काही ठिकाणी एकाद दोन खाटा रिक्त असल्याची स्थिती रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत होती. अहवाल पाॅझिटिव्ह येताच रुग्ण स्वॅब तपासणी केलेले केंद्र गाठत आहे; परंतु तेथे गेल्यानंतर उपचारासाठी दाखल होण्यासाठी कित्येक तास ताटकळण्याची वेळ रुग्णांवर ओढावत आहे. कोविड सेंटर, रुग्णालय गाठल्यानंतर जागा नसल्याचे सांगितले जात आहे. त्यामुळे एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी, दुसऱ्या ठिकाणाहून तिसऱ्या ठिकाणी रुग्णांना जावे लागत आहे. अशावेळी ज्येष्ठ नागरिकांची सर्वाधिक तारांबळ उडत आहे. रुग्णालयांबाहेर खाटा नसल्याचे फलक झळकले आहे. मोठ्या प्रमाणात कोरोना तपासणी आणि निदान होत आहे; परंतु त्या तुलनेत खाटांची व्यवस्था अपुरी पडत आहे. रुग्णसंख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रत्येकाला खाटा मिळवून देण्यासाठी आरोग्य यंत्रणेची दमछाक होत आहे.
शहरातील कोरोना रुग्णांच्या खाटांची परिस्थिती (रविवारी रात्री ८.३० वाजेपर्यंत)
रुग्णालय एकूण खाटा भरलेल्या खाटा रिक्त खाटा
१) सुमनांजली हाॅस्पिटल २८ २८ ०
२)अजंता हाॅस्पिटल ३८ २५ १३
३)जे. जे. प्लस हाॅस्पिटल १४ १४ ०
४) एम्स हाॅस्पिटल ४८ ४२ ६
५)धनवई हाॅस्पिटल १४ १४ ०
६)लाइफ हाॅस्पिटल ३५ ३० ५
७)श्रद्धा हाॅस्पिटल २२ २१ १
८) घाटी ५०० ४१२ ८८
९) धूत हाॅस्पिटल ११५ ११० ५
१०) बजाज हाॅस्पिटल ६० ५३ ७
११)ओरिओन सिटी केअर हाॅस्पिटल ४३ ४३ ०
१२) मेडिकव्हर हाॅस्पिटल ९० ९० ०
१३)सिग्मा हाॅस्पिटल ७६ ७६ ०
१४) माणिक हाॅस्पिटल ६८ ६८ ०
१५)एशियन हाॅस्पिटल ५५ ५५ ०
१६)अपेक्स हॉस्पिटल ५४ ५४ ०
१७)एमजीएम हॉस्पिटल ३६७ २२८ १३९
१८)एमआयटी काॅलेज हाेस्टेल २९५ २९५ ०
१९)गव्हर्नमेंट इंजि. सीसीसी सेंटर २५० २५० ०
२०)मेल्ट्राॅन ३०० २७४ २६