शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

विद्यापीठातील खेळाची मैदाने, जलतरण तलावाचे होणार खाजगीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2020 19:35 IST

विद्यापीठाने मैदानांच्या खाजगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे.

ठळक मुद्देव्यवस्थापन परिषदेच्या निर्णयानंतर समितीची स्थापना

- राम शिनगारेऔरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांच्या मैदानाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत मंजूर करण्यात आला आहे. या मैदानाच्या खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. 

विद्यापीठाने मैदानांच्या खाजगीकरणाच्या घेतलेल्या निर्णयाला विविध राजकीय पक्षांशी संबंधित विद्यार्थी संघटनांनी विरोध दर्शविला आहे. अधिसभा सदस्य अ‍ॅड. विजय सुबुकडे पाटील यांनी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांना निवेदन देत खाजगीकरणाचा निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. प्रभारी कुलसचिवांनी काढलेल्या परिपत्रकानुसार १७ फेब्रुवारी रोजी झालेल्या व्यवस्थापन परिषदेच्या बैठकीत विद्यापीठातील स्विमिंग पूल, बॅडमिंटन हॉल, अ‍ॅथलेटिक्स, कबड्डी, खो-खो, हॉलीबॉल, फुटबॉल आणि बास्केटबॉल या खेळांच्या मैदानाचे खाजगीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच खाजगीकरणाची प्रक्रिया राबविण्यासाठी समितीची स्थापना करण्यात आली आहे. या समितीचे अध्यक्ष व्यवस्थापन परिषदेचे सदस्य डॉ. फुलचंद सलामपुरे आहेत. समितीच्या सदस्य सचिव म्हणून क्रीडा विभागाच्या विभागप्रमुख डॉ. कल्पना झरीकर यांची निवड केली आहे.  व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. सुनील निकम, शिवाजी महाविद्यालय कन्नडचे डॉ. उदय डोंगरे, तेरणा महाविद्यालय उस्माबानादचे डॉ. चंद्रजित जाधव, स.भु.चे डॉ. दयानंद कांबळे, महापालिकेच्या जलतरण तलावाचे डॉ. अभय देशमुख यांची समितीच्या सदस्यपदी निवड केली आहे. ही समितीची खाजगीकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार आहे. याला विद्यार्थी संघटनांनी प्रखर विरोध नोंदवला असून, निर्णय रद्द करण्याची मागणी केली आहे. विद्यापीठाने कोट्यवधी रुपये खर्च करून मैदाने तयार केली असून, ही मैदाने खाजगी व्यक्तींच्या ताब्यात देण्यास हा विरोध दर्शविण्यात येत आहे.

शारीरिक शिक्षण विभागात नियमित तासिका घ्याविद्यापीठातील शारीरिक शिक्षण विभागात नियमित तासिका घेण्यात येत नाहीत. त्याठिकाणी विद्यार्थ्यांची बायोमेट्रिक हजेरीची नोंदही केली जात नसल्याचा आरोप अ‍ॅड. सुबुकडे यांनी निवेदनात केला आहे. याशिवाय शारीरिक शिक्षण विभागात मोठ्या प्रमाणात गैरप्रकार करण्यात येत आहेत. खेळाडूंना स्पर्धेत पाठविण्यापासून प्रशिक्षणापर्यंत प्रत्येक ठिकाणी लॉबिंगसह आर्थिक व्यवहार केले जात आहेत. त्यामुळे विद्यमान क्रीडा संचालकांनी पदावरून काढण्याची मागणीही करण्यात आली आहे. याविषयी विद्यापीठ प्रशासनाशी संपर्क साधला असता प्रतिसाद मिळाला नाही.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादAurangabadऔरंगाबादfundsनिधी