औरंगाबाद : प्रा. साई महाशब्दे संचालित शब्दसह्याद्री राज्यस्तरीय ऑनलाईन वक्तृत्व स्पर्धेचा पारितोषिक वितरण समारंभ उत्साहात पार पडला.
लॉकडाऊनच्या काळात कलागुणांना वाव मिळावा या उद्देशाने प्रा. महाशब्दे यांच्या मार्गदर्शनाखाली या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आले होते. संपूर्ण राज्यातून ३०० हून अधिक वक्ते व श्रोत्यांनी या स्पर्धेत उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
शब्दसह्याद्री महाराष्ट्राचा सर्वोत्कृष्ट वक्ता म्हणून रेणुका धुमाळ (औरंगाबाद), प्रांजल कुलकर्णी (अहमदनगर), अक्षदा खेडकर (रत्नागिरी), शुभम पाटील (जळगाव), रूपाली गिरवले (अहमदनगर), यश पाटील (ठाणे), अर्चना आयला (मुंबई ), श्रुती बोरस्ते (नाशिक), गणेश लोळगे (कोल्हापूर), अश्विनी सानप (सातारा) व प्राजक्ता कुलकर्णी (औरंगाबाद) या विजेत्यांचा समावेश आहे. याशिवाय ११ नवोदित, शालेय गटातील स्पर्धकांना प्रोत्साहनपर विशेष उत्तेजनार्थ पारितोषिके प्रदान करण्यात आली. याशिवाय उत्कृष्ट श्रोता म्हणून ११ स्पर्धकांना पुरस्कार देण्यात आला. पारितोषिक वितरणप्रसंगी उपजिल्हाधिकारी अंजली धानोरकर, लेखक संजय आवटे, अपर आयुक्त किसनराव लवाटे, रायगडचे सहायक आयुक्त, विनोदी अभिनेता प्रकाश भागवत, अभिनेत्री साक्षी गांधी, आकाशवाणीच्या कार्यक्रम अधिकारी नम्रता फडके अशा विविध क्षेत्रांतील दिग्गज अतिथींनी स्पर्धकांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय समारोप प्रा. साई महाशब्दे यांनी केला.