औरंगाबाद : भौतिक सुविधांचा अभाव असलेल्या सहा महाविद्यालयांवर कारवाई केल्यानंतर आणखी तीन महाविद्यालयांच्या काही अभ्यासक्रमांना २०२२-२३ या शैक्षणिक वर्षातील प्रवेशाला बंदी आणि प्रत्येकी दोन लाख रुपयांचा दंड आकारण्याचे आदेश कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी गुरुवारी (दि.२८) दिले. एकूण नऊ महाविद्यालयांत प्रवेश बंद करण्यात आले असून, त्यांना दंड आकारण्यात आल्याने नफेखोरी करणारी महाविद्यालये धास्तावले आहेत.
कोहिनूर महाविद्यालयात भौतिक सुविधांचा अभाव, घसरलेली गुणवत्ता, नॅक मूल्यांकन, प्राचार्य आणि अध्यापकांचा अभाव असल्याचा प्रकार समोर आला. त्यामुळे विद्यापीठ कार्यक्षेत्रातील नो ग्रेड, ग्रेड घसरलेल्या ७० महाविद्यालयांची यादी तयार करून पहिल्या दहा महाविद्यालयांपैकी नऊ महाविद्यालयांची तपासणी पूर्ण झाली. त्यापैकी आतापर्यंत आठ सुनावण्या पूर्ण झाल्या. या आठही महाविद्यालयांतील काही अभ्यासक्रमांना प्रवेशबंदी आणि दोन लाखांचा दंड करून पुढील सहा महिन्यांत सुधारणा करण्याची संधी देण्यात आली आहे.
या तीन महाविद्यालयांवर कारवाईतपासणी केलेल्या महाविद्यालयांना आपली बाजू मांडण्याची संधीही देण्यात आली होती. गुरुवारी पडेगाव येथील वामनराव पितांबरे महाविद्यालय, रोशनगेट येथील सर सय्यद कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय आणि पाथ्री येथील राजर्षी शाहू कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयांची सुनावणी झाली. त्यात समाधानकारक बाब समोर न असल्याने कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ कलम १२ (१४) (च) अन्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून या तिन्ही महाविद्यालयांत न प्रवेश रद्द करण्याचा आदेश दिले. तसेच दोन लाखांचा दंड भरण्याचे आदेश गुरुवारी देण्यात आले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील १२ महाविद्यालयांची तपासणी सुरूचार अधिष्ठाता व प्र-कुलगुरू यांच्या अध्यक्षतेखाली पाच समित्या गुरुवारी पुढच्या टप्प्यातील १२ महाविद्यालयांच्या तपासणीसाठी रवाना झाल्या असल्याचे प्र-कुलगुरू डाॅ. श्याम शिरसाट यांनी सांगितले. सलग्नता रद्द न करता विद्यार्थी हिताच्या सुविधा वाढवून गुणवत्ता वाढीसाठी ही निरंतर मोहीम सुरू राहील, असेही प्र-कुलगुरूंनी स्पष्ट केले.--