लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहरातील कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी विविध कंपन्या, खाजगी संस्था यांनी दिलेल्या प्रकल्प अहवालानुसार सर्व प्रस्तावांचा तांत्रिक अहवाल तयार करावा, असे आदेश सोमवारी महापौर नंदकुमार घोडेले यांनी प्रशासनाला दिले. यासंदर्भात लवकरच अंतिम निर्णय घ्यावा लागणार असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले.चीन येथील एक खाजगी कंपनी कच-यावर कशा पद्धतीने प्रक्रिया करते हे पाहण्यासाठी मनपा अधिकारी व पदाधिका-यांचे एक शिष्टमंडळ मागील महिन्यात स्वखर्चाने गेले होते. शिष्टमंडळात उपमहापौर विजय औताडे, शिवसेना गटनेते मकरंद कुलकर्णी, कार्यकारी अभियंता डी.पी. कुलकर्णी, वॉर्ड अधिकारी भालचंद्र पैठणे यांचा समावेश होता. शिष्टमंडळाने आज एका पत्रकार परिषदेत सविस्तर माहिती दिली. चीनमधील चेनचाऊ या ठिकाणी १०० एमएलडी क्षमतेच्या वेस्ट वॉटर प्लांटची पाहणी करण्यात आली. त्यानंतर यंगसुई या ठिकाणी घनकचºयावर प्रक्रिया करणाºया १५ टन क्षमतेच्या प्रकल्पाची माहिती घेतली.सुथांग या ठिकाणी ४५ टन क्षमतेच्या नव्याने उभारण्यात येत असलेल्या प्रकल्पाची पाहणी केली. नॅनिंग येथील २ जलशुद्धीकरण प्रकल्पाला भेट दिली. कंपनीने आधुनिक तंत्रज्ञानाने उभारलेल्या प्रकल्पाची कार्यक्षमता प्रभावीपणे असल्याचे व जलप्रक्रिया केलेले पाणी दुर्गंधीविरहित असल्याचे दिसून आले. कचºयाचा १५ टन क्षमतेचा प्रकल्प उभारण्यासाठी ६ ते ७ कोटींचा खर्च येतो, ओला व सुका कचरा वेगळा करून सुक्या कचºयावर प्रक्रिया केली जाते.औरंगाबादेत हा प्रकल्प राबवायचे ठरल्यास फक्त सुका कचरा जाळता येऊ शकतो. ओल्या कचºयाचा प्रश्न कायम राहणार आहे. शहरात ४० टक्के सुका, तर ६० टक्के ओला कचरा तयार होतो. शहरात नऊ ठिकाणी ही कचरा प्रक्रिया केंद्रे उभारल्यास मनपाला ६३ ते ६५ कोटींचा खर्च येईल. कचरा जाळल्यानंतर त्यापासून राख तयार होते.ही राख रस्ते तयार करण्यासाठी उपयोगी पडू शकते, असेही शिष्टमंडळाने सांगितले. पत्रकार परिषदेला सभापती गजानन बारवाल, अतिरिक्त आयुक्त श्रीकृष्ण भालसिंग, उपायुक्त वसंत निकम, कार्यकारी अभियंता डी.पी. कुलकर्णी, हेमंत कोल्हे, विधि सल्लागार अपर्णा थेटे, आरोग्य अधिकारी संध्या टाकळीकर, प्रभारी मुख्य लेखाधिकारी नजीर दुर्राणी आदींची उपस्थिती होती.
घनकच-यावर प्रक्रिया; तांत्रिक अहवाल तयार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 28, 2017 1:17 AM