शहरं
Join us  
Trending Stories
1
सदाभाऊ खोतांची शरद पवारांवर वादग्रस्त टीका; अजित पवार संतापले, महायुतीला थेट इशारा
2
राज्य गुंतवणुकीत मागे पडले, ६४ हजार महिला बेपत्ता, शोधच लागेना; शरद पवारांची टीका
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:"मुर्खासारखं काय बोलतो...याचं नाव घेऊन ठेवा रे", उद्धव ठाकरे पोलिसावर संतापले! काय घडलं?
4
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : दरमहा महिलांना ३ हजार, बेरोजगारांना ४ हजार अन्...; मविआच्या ५ गॅरंटी काय आहेत?
5
मविआ-महायुतीत स्पर्धा लागली! लाडक्या बहिणींना ९०० रुपये जास्त देणार; दोघांच्या जाहीरनाम्यात कुणाला काय मिळणार...
6
Maharashtra Election 2024: निकालानंतर अजित पवारांना सोबत घेण्याची वेळ आली, तर काय? जयंत पाटील म्हणाले... 
7
KL राहुल आणि ध्रुव जुरेलची Team India त एन्ट्री; ऋतुराज गायकवाडच्या नेतृत्वात खेळणार
8
देवेंद्र फडणवीसांना येणाऱ्या धमक्यांवर सातारचे खासदार छत्रपती उदयनराजे संतापले
9
राजू शेट्टींचा आश्चर्यकारक निर्णय! कोल्हापूर पट्ट्यात ठाकरे गटाच्या उमेदवाराला जाहीर पाठिंबा
10
बारामतीमध्ये कुणाचा विजय होणार? जयंत पाटील म्हणाले, "निर्णय कसा लागेल सांगणे अवघड"
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "चेहऱ्यावरून त्यांना बोलणं यावरून तुमची..."; सदाभाऊ खोतांच्या टीकेला जितेंद्र आव्हाडांचं प्रत्युत्तर
12
दमदार! आता WhatsApp युजर्स शोधणार फोटो खरा आहे की खोटा, काय आहे नवीन फीचर?
13
Baba Siddique : बाबा सिद्दिकी हत्येप्रकरणी मोठी अपडेट; मुंबई पोलिसांनी दिली महत्त्वाची माहिती, म्हणाले...
14
'फाईट-फाईट-फाईट...'! एका फोटोनं ट्रम्प यांचं नशीब बदललं, आता बनले अमेरिकेचे 47वे राष्ट्राध्यक्ष
15
टाटाच्या ब्रँडने मोठा निर्णय घेतला; जग्वारने ब्रिटनमध्ये कारची विक्री थांबविली, कारण काय?
16
केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत सरकारचा मोठा निर्णय; लाखो विद्यार्थ्यांचा होणार फायदा
17
Maharashtra Vidhan Sabha 2024: नवी मुंबईत अपक्ष कोणाच्या व्होट बँकेला पाडणार भगदाड?
18
“काँग्रेसने आत्मविश्वास गमावला आहे, जाहिरातीत पराभूत मानसिकतेचे लक्षण दिसते”: अशोक चव्हाण
19
IPL मेगा लिलावाआधी Shreyas Iyer पेटला! ज्या संघाला चॅम्पियन केलं त्यांनी दिला 'नारळ'; आता...
20
ट्रम्प यांचं अभिनंदन करण्यास पुतिन यांचा नकार; अमेरिका-रशिया संबंधांवर मोठं विधान

२ वर्षांपासून ‘पीएसआय’ परीक्षेची प्रक्रिया अपूर्ण;१५०० विद्यार्थ्यांचा जीव टांगणीला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 06, 2020 4:48 PM

महापरीक्षा पोर्टल बंदमुळे परीक्षाही थांबल्या

ठळक मुद्देजाहिरातीनुसार १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. यातून ३८७ जणांची निवड होणार आहे. उर्वरित ११०० पेक्षा अधिक युवकांना अंतिम निकालात स्थान मिळणार नाही.

औरंगाबाद : महाराष्ट्र लोकसेवा आयोगातर्फे फेब्रुवारी २०१८ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या परीक्षेची पूर्व, मुख्य आणि शारीरिक चाचणी परीक्षांसह मुलाखती घेण्यात आल्या आहेत. परंतु अंतिम निकाल जाहीर झाला नसल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

एमपीएससी आयोगातर्फे ३ फेब्रुवारी २०१८ रोजी अराजपत्रित अधिकारी- गट ब, राज्य करनिरीक्षक आणि पोलीस उपनिरीक्षकपदासाठी जाहिरात देण्यात आली होती. या जाहिरातीनुसार १३ मे २०१८ रोजी पूर्वपरीक्षा घेण्यात आली. त्यानंतर मुख्य परीक्षा दोन टप्प्यात घेण्यात आली. यात पहिला टप्पा २ आॅगस्ट रोजी आणि दुसरा टप्पा २ सप्टेंबर २०१८ रोजी पार पडला. यानंतर आॅक्टोबर २०१९ मध्ये शारीरिक चाचणी घेण्यात आली. ही चाचणी परीक्षा चार महिने चालली. जानेवारी २०२० मध्ये चाचणी परीक्षा संपल्यानंतर महिनाभरापेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. तरीही अंतिम परीक्षेचा निकाल जाहीर झालेला नाही. पूर्व, मुख्य परीक्षेतील चाळणी होऊन शारीरिक चाचणी परीक्षा १५०० युवकांनी दिली आहे. 

हे युवक दोन वर्षांपासून या परीक्षेची तयारी करीत असल्यामुळे त्यांना इतर परीक्षांकडे लक्षही देता आले नाही. या जाहिरातीनुसार ३८७ जणांची निवड होणार आहे. त्यामुळे उर्वरित ११०० पेक्षा अधिक युवकांना अंतिम निकालात स्थान मिळणार नाही. या विद्यार्थ्यांना इतरही परीक्षेची तयारी करता येत नसल्यामुळे अंतिम निकाल जाहीर करण्याची मागणी परीक्षार्थींकडून करण्यात येत आहे. 

याशिवाय फेब्रुवारी २०१९ मध्ये पोलीस उपनिरीक्षकपदाची जाहिरात देण्यात आली होती. यात पूर्व परीक्षेनंतर मुख्य परीक्षा घेण्यात आली होती. या मुख्य परीक्षेचा निकाल दोन दिवसांपूर्वी जाहीर झाला आहे. त्यामुळे यात उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची तात्काळ शारीरिक चाचणी घेऊन अंतिम निकाल त्वरीत जाहीर करण्याची मागणीही परीक्षार्थींनी केली आहे.

महापोर्टल बंद केले पुढे काय?भाजप सरकारच्या काळात विविध विभागांमधील पदभरतीसाठी महापरीक्षा पोर्टलच्या माध्यमातून परीक्षा घेण्यात आल्या होत्या. या पोर्टलविषयी विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष होता. सरकार बदलताच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सत्ताधारी पक्षातील आमदारांच्या मागणीनुसार महापोर्टलला मूठमाती दिली आहे. ही यंत्रणा बंद करतानाच पर्यायी यंत्रणा काय? असा सवाल स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या युवकांमध्ये चर्चिला जात आहे.

टॅग्स :MPSC examएमपीएससी परीक्षाStudentविद्यार्थीAurangabadऔरंगाबाद