शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

कच-यावर प्रक्रिया; कंपन्या सरसावल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 24, 2017 12:51 AM

इंग्लंड येथील न्यू सेंटर एनर्जी या कंपनीने कच-यापासून वीजनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : नारेगाव येथील शेतक-यांनी आंदोलन केल्यानंतर महापालिका प्रशासनाने कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी हालचालींना वेग दिला आहे. आतापर्यंत दोन कंपन्यांनी मनपाकडे कच-यावर प्रक्रिया करण्यासाठी सादरीकरण केले. आता इंग्लंड येथील न्यू सेंटर एनर्जी या कंपनीने कच-यापासून वीजनिर्मिती करण्याची तयारी दर्शवली असून, शहरात हा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असल्याचे कळविले आहे. आयुक्तांनी तातडीने या प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी ३०, ३१ आॅक्टोबर आणि २ नोव्हेंबर रोजी वेळ देण्याची तयारी दर्शवली आहे.नारेगाव येथील शेतक-यांनी मनपाला कच-यावर प्रक्रिया करणे, नवीन कचरा नारेगावात आणून न टाकण्यासाठी फक्त ९० दिवसांची मुभा दिली आहे. या कालावधीत मनपाने ठोस पाऊल न उचलल्यास शेतकरी पुन्हा रस्त्यावर उतरणार आहेत. मनपाने कच-याची विल्हेवाट लावण्यासाठी विविध कंपन्यांकडून प्रस्ताव मागविण्याची तयारी सुरू केली आहे. चीनच्या कंपनीने अलीकडेच सादरीकरण केले. त्यानंतर इंग्लंडमधील कंपनीने वीजनिर्मिती करण्याचा प्रकल्प उभारण्यास इच्छुक असल्याचे मनपा प्रशासनाला कळवले असून, तसा प्रस्ताव आयुक्तांना प्राप्त झाला आहे. या कंपनीचा एक प्रकल्प जर्मनीमध्ये उभारण्यात आला असून, देशात दोन शहरांमध्ये हा प्रकल्प उभारण्यासाठी प्रस्ताव सादर केला आहे. दररोज ५०० मेट्रिक टन कचºयापासून ३० ते ७० मेगावॅट वीजनिर्मिती केली जाईल. यासाठी मनपाला कोणताही खर्च लागणार नाही. प्रकल्प उभारण्यासाठी जागा द्यावी लागेल. कंपनी प्रकल्प उभारण्याचा खर्च स्वत: करणार असून, तयार होणारी वीज सरकारला विकण्यात येईल, असा हा प्रस्ताव प्राप्त झाला आहे. कंपनीने प्रकल्पाचे सादरीकरण करण्यासाठी वेळ मागितला असून, आयुक्तांनी ३०, ३१ आॅक्टोबर किंवा २ नोव्हेंबर या दिवशी कंपनीचे अधिकारी प्रकल्पाचे सादरीकरण करू शकतील, असे कळवले आहे. कंपनीच्या प्रकल्पाचे सादरीकरण झाल्यानंतर योग्य तो निर्णय घेतला जाईल.