औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक शैक्षणिक विभागांचे काम चांगले असल्याचे मत ‘नॅक’च्या रंगीत तालमीनिमित्त आलेल्या टीमने व्यक्त केले आहे.हैदराबाद येथील केंद्रीय उर्दू विद्यापीठाचे माजी कुलगुरू डॉ. महंमदमियाँ यांच्या अध्यक्षतेखाली विविध ८ राज्यांतील दहा प्रोफेसरच्या समितीने मागील तीन दिवसांपासून विद्यापीठातील गुणवत्तेचे परीक्षण केले. बंगळुरू येथील ‘नॅक’ समितीतर्फे पुढील महिन्यात अंतिम आठवड्यात मूल्यांकन केले जाणार आहे. ‘नॅक’ टीमच्या भेटीत कोणतीही कमतरता, त्रुटी राहू नये, यासाठी बाहेरील राज्यातील एका उच्चस्तरीय समितीमार्फत १३ ते १५ डिसेंबरदरम्यान ‘मॉक ड्रील’ घेण्यात आले. तीन दिवसांच्या पाहणीत १० तज्ज्ञांच्या समितीने ५३ विभागांना भेटी दिल्या आहेत. शनिवारी ‘नॅक’प्रमाणे एक्झिट मीटिंग घेण्यात आली. डॉ. महंमदमियाँ यांच्यासह दहा सदस्यांची उपस्थिती होती. कुलगुरू, प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, प्रभारी कुलसचिव डॉ. साधना पांडे यांच्यासह सर्वच संवैधानिक अधिकाºयांची यावेळी उपस्थिती होती. समितीने विज्ञानमधील भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, संगणकशास्त्र आदींसह विविध विभागांचे काम चांगले असल्याचे म्हटले आहे. चॉईस बेस्ड के्रडिट सिस्टीम (सीबीसीएस), डीएनए बार कोडिंग सेंटर, दीनदयाल उपाध्याय कौशल केंद्र (डीडीयूके) यांचे काम उत्तम असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. रुसाचे काम चांगले असून, त्यामार्फत मिळालेल्या निधीचा विनियोग चांगल्या पद्धतीने झाला असल्याचेही समितीने स्पष्ट केले.विद्यार्थ्यांचे संवाद कौशल्य सुधाराविद्यापीठ परिसरातील विविध शैक्षणिक विभागांत शिक्षण घेणाºया विद्यार्थ्यांमध्ये संवाद कौशल्याचा अभाव असल्याचे निरीक्षण समितीने नोंदविले आहे. प्राध्यापक, विभागप्रमुखांना नजीकच्या काळात त्यावर काम करावे लागणार आहे, असे निरीक्षणही समितीने नोंदविले.
प्राध्यापक, कर्मचाऱ्यांच्या रिक्त जागा हीच समस्या
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 16, 2018 10:39 PM
: डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या शिक्षक आणि शिक्षकेतरांच्या रिक्त जागांची गंभीर स्थिती असून, ही प्रशासनातील कमकुवत बाजू आहे. प्राध्यापकांच्या १०५ आणि कर्मचाºयांच्या २७५ जागा रिक्त आहेत. हीच समस्या मोठी आहे. विज्ञान विद्याशाखेतील अनेक शैक्षणिक विभागांचे काम चांगले असल्याचे मत ‘नॅक’च्या रंगीत तालमीनिमित्त आलेल्या टीमने व्यक्त केले आहे.
ठळक मुद्देविद्यापीठ : ‘नॅक’च्या ‘मॉक ड्रील’मध्ये तज्ज्ञांनी व्यक्त केली चिंता