लोकमत न्यूज नेटवर्कनांदेड : डेरा सच्चा सौदाचे गुरमीत बाबा राम-रहिम यांना अत्याचार प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरविल्यानंतर नांदेडात शीख समाजाच्या वतीने त्यांचा प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध करण्यात आला़ यावेळी फटाक्यांची आतषबाजी करीत जल्लोषही साजरा केला़गुरमीत बाबा राम-रहिम यांनी अनेकवेळा आपल्या वक्तव्यातून समाजाच्या धार्मिक भावना दुखावल्या आहेत़ त्यामुळे न्यायालयाने त्यांना आज दोषी ठरविल्यानंतर जल्लोष करण्यात येत असल्याची प्रतिक्रिया दिलीपसिंघ सोढी यांनी दिली़ तसेच यापूर्वी १७ मे रोजी बाबा राम-रहिम यांच्यावर कारवाईची मागणी जिल्हाधिकाºयांकडे निवेदनाद्वारे करण्यात आली होती़शुक्रवारी दुपारी सचखंड गुरुद्वारा परिसरात फटाके फोडून आनंदोत्सव साजरा करण्यात आला़यावेळी रवींद्रसिंघ कपूर, गुरप्रीतकौर सोढी, शेरसिंघ भूल्लर, धरमसिंघ संधू, रवीसिंघ पुजारी, प्रतापसिंघ खालसा, हरविंदरसिंघ मन्नन, संतोष ओझा, रंजितसिंघ मन्नन, गगनदीपसिंघ, अंबादास जोशी, गुरुबच्चनसिंघ यांची उपस्थिती होती़
प्रतीकात्मक पुतळा जाळून निषेध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2017 12:32 AM