औरंगाबाद : पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिकाणी संतपीठ सुरू झाले नाही. मात्र येत्या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या मान्यता होऊन हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. अशोक तेजनकर व संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.पैठण येथील संतपीठात सुरू करण्यात येणाºया अभ्यासक्रमांचा अहवाल नुकताच संतपीठाचे नोडल अधिकारी तथा विद्यापीठाचे प्रकुलगुरू डॉ. अशोक तेजनकर, संजय जोशी यांनी शिक्षणमंत्री विनोद तावडे, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे आणि पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर यांच्याकडे सुपूर्द केला. मुंबईत आयोजित संत परिषदेला उपस्थितीत संत-महंतांच्या हजेरीत हा प्रस्ताव सादर केला असल्याचे संजय जोशी यांनी सांगितले. पैठण येथे उभारलेल्या संतपीठाच्या इमारतीमध्ये ५० वर्गखोल्या आहेत. याच इमारतीत ३ सभागृह असून, प्रशासकीय इमारतीमध्ये संतपीठाचे कामकाज व्यवस्थितपणे सुरू होईल, एवढ्या पायाभूत सुविधा आहेत. विद्यार्थ्यांना राहण्यासाठी १०० विद्यार्थी क्षमतेचे दोन वसतिगृह उपलब्ध आहेत. याठिकाणी अभ्यासक्रम सुरू करण्यासाठी आवश्यक असलेल्या प्राध्यापक आणि शिक्षकेतर कर्मचाºयांच्या मान्यतेचा प्रस्ताव तात्काळ मंजूर करण्यात येणार आहे. यामुळे येत्या जून महिन्यापासून संतपीठ सुरू होणार असल्याचेही डॉ. तेजनकर आणि जोशी यांनी स्पष्ट केले. यावेळी मराठी विभागप्रमुख डॉ. अशोक देशमाने, डॉ. दासू वैद्य उपस्थित होते.पदविका, पदवी व पदव्युत्तर अभ्यासक्रमसंतपीठामध्ये तीन विषयांत पदविका अभ्यासक्रम सुरू केला जाणार आहे. यात तबला, पखवाजवादन, संवादिनी गायन, सांप्रदायिक गायन, संस्कृत, गीता अभ्यासाचा समावेश असेल. पदवी अभ्यासक्रमातही विविध विषयांचा समावेश असणार आहे. तर पदवीच्या ऐच्छिक विषयात इतिहास, राज्यशास्त्र आणि समाजशास्त्र या विषयांचा समावेश असेल, अशी माहिती डॉ. अशोक तेजनकर यांनी दिली.
२० वर्षांपासून रखडलेला प्रकल्प मार्गी लागणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 13, 2018 9:58 PM
पैठण येथे संतपीठ स्थापन करण्याचा निर्णय ४ नोव्हेंबर १९९८ रोजी तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर जोशी यांनी घेऊन उद्घाटन केले. या उद्घाटनानंतर १३ फेब्रुवारी २०१४ रोजी संतपीठासाठी आवश्यक असलेल्या इमारतीचे बांधकाम पूर्ण होऊन उद्घाटन झाले. मात्र तरीही त्या ठिकाणी संतपीठ सुरू झाले नाही. मात्र येत्या दोन महिन्यांत सर्व प्रकारच्या मान्यता होऊन हा प्रकल्प मार्गी लागणार असल्याची माहिती नोडल अधिकारी डॉ. अशोक तेजनकर व संजय जोशी यांनी पत्रकार परिषदेत दिली.
ठळक मुद्देसंतपीठ : नोडल अधिकाऱ्यांची पत्रकार परिषदेत माहिती