औरंगाबाद : मराठवाड्यातील वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी गुंडांना हद्दपार करण्याचे पोलिसांचे चारशेवर प्रस्ताव उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे धूळखात पडून आहेत, अशी खंत विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांनी मंगळवारी बोलून दाखविली. पोलिसांकडून आणखी ६६० नवे प्रस्ताव तयार केले जात असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. गणेशोत्सव आणि बकरी ईदनिमित्त कायदा-सुव्यवस्था राखण्यासाठी केल्या जाणाऱ्या उपाययोजनांची माहिती देण्यासाठी बोलाविण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी वरील माहिती दिली. वाढत्या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद पोलिसांनी गेल्या दोन वर्षांत ४७२ गुंडांना हद्दपार करण्याचे प्रस्ताव संबंधित उपविभागीय महसूल अधिकाऱ्यांकडे सादर केले होते. यापैकी मोजकेच प्रस्ताव मंजूर झाले असून, सुमारे चारशे प्रस्ताव अजूनही प्रलंबित आहेत, असे पाटील यांनी स्पष्ट केले. याबाबत जिल्हाधिकारी आणि उपविभागीय अधिकाऱ्यांना स्मरणपत्रे पाठविण्यात आल्याचेही त्यांनी नमूद केले.
गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी हद्दपारीचे चारशेवर प्रस्ताव पडून
By admin | Published: September 07, 2016 12:13 AM