शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मवीआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
8
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
9
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
10
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
11
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
12
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
13
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
14
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
15
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
16
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
17
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
18
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
19
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
20
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'

देवगिरी महाविद्यालयाचा विद्यापीठाकडे स्वायत्त होण्यासाठी प्रस्ताव

By योगेश पायघन | Published: February 27, 2023 6:56 PM

देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली.

छत्रपती संभाजीनगर ः मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळाचे देवगिरी महाविद्यालय हे आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ पासून स्वायत्त होणार आहे. त्यासाठी डाॅ. बाबाासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात सोमवारी सादर केला. आवश्यक शिफारशीसह हा प्रस्ताव विद्यापीठ अनुदान आयोगाला पाठवण्यात येईल. युजीसीच्या मान्यतेनंतर महाविद्यालय स्वायत्त होईल. अशी अशी माहीती कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले यांनी दिली.

प्राचार्य डाॅ. अशोक तेजणकर म्हणाले, देवगिरी महाविद्यालय स्वायत्ततेच्या दिशेने प्रवास करत असल्याचे मंडळाचे सरचिटणीस आमदार सतीश चव्हाण यांनी ऑक्टोबर २०२२ मध्ये स्पष्ठ केले होते. त्यानुसार महाविद्यालयाने पाऊले टाकली. सोमवारी विद्यापीठाकडे स्वायत्ततेचा प्रस्ताव सादर केला आहे. महाविद्यालयाला नॅकने ए प्लस प्लस दर्जा दिला आहे. हा दर्जा पुढील सात वर्षांसाठी आहे. देवगिरी महाविद्यालयात पदवीचे १५ अभ्यासक्रमाचे साडे सहा हजार विद्यार्थी शिकत असून पदव्युत्तरचे २२ अभ्यासक्रमात २ हजार विद्यार्थी शिकत आहे. पीएचडी संशोधनाचे १२ विषयांचे रिसर्च सेंटर आहेत. पदवीचे ६ विषय अनुदानित आहेत. महाविद्यालय स्वायत्त झाल्यानंतर अनुदानित विषयांच्या विद्यार्थी शुल्कात फरक पडणार नाही. मात्र, ज्या विषयांना अनुदान नाही, त्याचे शुल्क महाविद्यालय ठरवेल. युजीसीच्या मान्यतेनंतर आगामी शैक्षणिक वर्ष २०२३-२४ च्या सत्रापासून देवगिरी महाविद्यालय स्वायत्त होईल. त्यामुळे महाविद्यालयाची प्रवेश प्रक्रिया, परीक्षा घेणे, पदवी प्रदान करणे हे सर्वच शैक्षणिक कार्य महाविद्यालयातर्फे करण्यात येणार येईल.

नव्या शैक्षणिक धोरणाकडे वाटचाल...विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पारंपारीक शिक्षण देणारे पहिले महाविद्यालय स्वायत्ततेसाठी पुढे आले आहे. नव्या शैक्षणिक धोरणानुसार स्वयंपुर्ण मोठ्या महाविद्यालयांना, संस्थांना स्वायत्त होण्यासाठी प्रोत्साहन दिले जात असल्यााचे कुलगुरू डाॅ. प्रमोद येवले म्हणाले. तर स्वायत्त झाल्याने उद्योग, स्वयंरोजगार पुरक अभ्यासक्रम सुरू करता येतील. विद्यार्थ्यांना काैशल्यवाढीचे शिक्षण,नव्या शैक्षणिक धोरणानुसार सोयी सुविधा देता येईल. असे प्राचार्य डाॅ. तेजनकर म्हणाले.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar Marathvada university, Aurangabadडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, औरंगाबादEducationशिक्षणDevgiri College Aurangabadदेवगिरी महाविद्यालय औरंगाबाद