औरंगाबाद : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात (घाटी) उभारण्यात येणाऱ्या भौतिकोपचार (फिजीओथेरपी) व व्यवसायोपचार महाविद्यालयाचा प्रस्ताव मंत्रिमंडळापर्यंत पोहोचला आहे.
मराठवाड्यातील गोरगरीब रुग्णांचा आधार असलेल्या घाटी रुग्णालयाला केंद्र आणि राज्य सरकारकडून फक्त कागदोपत्री प्रकल्पांचा ‘डोस’ दिला जात आहे. आयुष रुग्णालय, फिजिओथेरपी महाविद्यालय, ‘डीईआयसी’ केंद्र, जनऔषधी केंद्र आदी प्रकल्प कागदावरच असल्याने आरोग्य सेवेचा विस्तार रेंगाळला आहे. अॅक्युपेशनल थेरपी आणि फिजिओथेरपी महाविद्यालय उभारण्यात यावे. यासाठी वारंवार प्रस्ताव पाठवण्यात येत होते. परंतु त्रुटी आणि तांत्रिक कारणांनी हा प्रस्ताव माघारी येत होता. अधिष्ठाता डॉ. कानन येळीकर यांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात प्रस्ताव पाठविण्यात आला आहे.
वरिष्ठ व्यवसाय उपचार तज्ज्ञ डॉ. सतिश मसलेकर यांनी मुंबईत वैद्यकीय संचालक डॉ. प्रविण शिनगारे यांच्याकडे पाठपुरावा केला आणि अखेर प्रस्ताव मंत्रीमंडळाच्या निर्णयासाठी ठेवण्यात आला आहे. घाटीतील प्रकल्प इतरत्र पळविण्यात येत आहे. फिजीओथेरपी महाविद्यालयदेखील पुण्याच्या मार्गावर जाण्याची शक्यता निर्माण झाली होती. मंत्रिमंडळाच्या मान्यतेनंतर महाविद्यालय उभारणीचा मार्ग मोकळा होणअर आहे.
पाच मजली इमारतशासकीय दंत महाविद्यालय आणि शाासकीय वैद्यकीय रुग्णालयाचा बाह्यरुग्ण विभागादरम्यान असलेल्या जागेवर ३८ कोटींची पाच मजली इमारत उभारणी प्रस्तावित आहे. अॅक्युपेशनल थेरपीचे ३० आणि फिजिओथेरपीचे ३० असे एकूण ६० विद्यार्थी याठिकाणी शिक्षण घेतील.