लोकमत न्यूज नेटवर्कपरभणी : ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाºयांना कार्यमुक्त केले नसल्याप्रकरणी जिल्ह्यातील विविध विभागातील चार अधिकाºयांना निलंबित करण्याचा प्रस्ताव परभणीचे तहसीलदार विद्याचरण कडवकर यांनी जिल्हाधिकाºयांकडे सादर केला आहे.या संदर्भात कडवकर यांनी ११ सप्टेंबर रोजी काढलेल्या पत्रात म्हटले आहे की, तालुक्यात सध्या ग्र्नामपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु आहे. या निवडणुकीसाठी विविध विभागातील अधिकाºयांच्या अधिनस्थ असलेल्या कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. परंतु, या कर्मचाºयांना जिल्हा आरोग्य अधिकारी आर.डी.खंदारे, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी रुपाली रंगारी, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य अनिल गौतम व सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता देशपांडे यांनी कार्यमुक्त केलेले नाही. ही अत्यंत गंभीर बाब आहे. त्यामुळे त्यांना निलंबित करण्यात यावे, असा प्रस्ताव कडवकर यांनी जिल्हाधिकारी पी. शिव शंकर व जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी प्रताप सवडे यांच्याकडे पाठविला आहे. यावर हे अधिकारी काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
चार अधिकाºयांच्या निलंबनाचा प्रस्ताव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 12:28 AM