कार्यशाळेत सुरुवातीला पाणी फाउंडेशनचे प्रादेशिक समन्वयक प्रल्हाद आरसुळ यांनी प्रास्ताविक केले. जि. प. सभापती अनुराधा चव्हाण यांनीदेखील समृद्ध गाव स्पर्धेसाठी तालुक्यातील गावांना हिरिरीने सहभाग घेण्याचे आवाहन केले, तर जिल्हा परिषदेच्या माध्यामातून मदत केली जाईल, असे आश्वासित केले. समृद्ध गाव ही स्पर्धा फक्त शेतकरी, भूमिहीन, महिला बचत गट आणि गावकऱ्यांसाठी मर्यादित न राहता गावचा निसर्ग, कीटक, पशुपक्षी, प्राणी यांच्यासाठीही खूप महत्त्वपूर्ण आहे, असे डॉ. अविनाश पोळ यांनी सांगितले. यावेळी जि. प. सदस्य शिवाजी पाथ्रीकर, नायब तहसीलदार काथार, उमेद अभियानचे सुरेश टोलमारे, तालुका समन्वयक अस्लम बेग, ग्रामसेवक, तलाठी, कृषी सहाय्यक, जलमित्रांची उपस्थिती होती. तालुक्यातील २४ गावांनी या स्पर्धेत सहभाग घेतला आहे.
‘समृद्ध गाव’ स्पर्धेसाठी फुलंब्रीत ‘समृद्ध संवाद’ कार्यशाळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 4:07 AM