छत्रपती संभाजीनगर : शहरात गेल्या काही दिवसांपासून वातावरणातील चढ-उतारामुळे सर्दी, खोकला आणि न्यूमोनिया, तापाचे रुग्ण वाढू लागले आहेत. त्याबरोबरच गॅस्ट्रोचेही रुग्ण वाढत असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले.
घाटी, जिल्हा सामान्य रुग्णालयासह खासगी रुग्णालयात गेल्या काही दिवसांत बालरुग्णांची संख्या वाढली आहे. ओपीडीत येणाऱ्या १० पैकी ५ मुले श्वसन विकाराने त्रस्त होत आहेत. उघड्यावरचे पदार्थ, पाणी टाळावे. अतिथंड पदार्थ मुलांना देणे टाळावे, असा सल्ला तज्ज्ञांनी दिला. जिल्हा रुग्णालयातील ओपीडीत रोज १२००-१३०० रुग्ण येत असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. दयानंद मोतीपवळे यांनी सांगितले.
वातावरणातील चढ-उताराचा फटकागेल्या काही दिवसांपासून वातावरणात सतत चढ-उतार होत आहे. त्याचा फटका बसत नागरिकांना बसत आहे. यात लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना सर्वाधिक फटका बसत आहे.
या आजाराचे रुग्ण वाढलेश्वसनविकार : बालरोगतज्ज्ञ डाॅ. अभय जैन म्हणाले, मागील एक आठवड्यापासून सर्दी, खोकल्याचे प्रमाण वाढले आहे. न्यूमोनियाचे रुग्णही वाढले आहे.गॅस्ट्रो : बालरोगतज्ज्ञ डाॅ. प्रशांत चव्हाण म्हणाले, सध्या गॅस्ट्रोचे रुग्ण अधिक आहे. मुलांना डायरिया झाल्यास डिहायड्रेशन होऊ शकते. अशावेळी हलका आहार सुरू ठेवावा आणि तत्काळ वैद्यकीय सल्ला घ्यावा.न्यूमोनिया : १० पैकी ५ मुलांना सर्दी, खोकला आढळत आहे. त्यात एकाला न्यूमोनियाचे निदान होत आहे, असे डाॅ. अभय जैन यांनी सांगितले.ताप : तापेच्या रुग्णांमध्येही वाढ झाली आहे. मुलांना अचानक ताप येतो आणि कमी होतो. असे वारंवार होत असल्याच्या तक्रारी पालकांकडून होत आहेत.
रोज १००-१२५ रुग्णांची ओपीडीजिल्हा सामान्य रुग्णालयातील बालरोग विभागात सध्या रोज १०० ते १२५ बालरुग्ण उपचारासाठी येत आहे. यात उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ‘व्हायरल’च्या रुग्णांची संख्या अधिक आहे.
पाणी उकळून द्यावेसध्या उलट्या, जुलाब, सर्दी, खोकला, ‘व्हायरल’चा त्रास मुलांमध्ये अधिक पाहायला मिळत आहे. मुलांना देण्यात येणारे पाणी उकळून थंड केलेले असावे. अतिथंड पाणी देणे टाळावे.-डाॅ. गोविंद भोसले, बालरोगतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय