लातूर : ज्येष्ठ विचारवंत कॉ. गोविंद पानसरे यांच्यावर त्यांच्या पत्नीवर झालेल्या गोळीबाराचा हल्ल्याचा लातुरातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी निषेध केला. सोमवारी दुपारी गांधी चौकातील महात्मा गांधी यांच्या पुतळ्यासमोर एक तास निदर्शने करण्यात आली. नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ले हे व्यक्तिगत नसून पुरोगामी विचार आणि महाराष्ट्रावरील हल्ले आहेत. याचा सर्व स्तरातून निषेध केला पाहीजे, असे मत माजी खासदार आणि ज्येष्ठ विचारवंत जनार्दन वाघमारे यांनी यावेळी काढले. सोमवारी सकाळी गोविंद पानसरे यांच्यावर व त्यांच्या पत्नीवर दाभोळकरांवरील हल्ल्यांसारखा हल्ला झाल्याचे आणि ते त्यात गोळीबाराने जखमी झाल्याचे वृत्त धडकले. जिल्ह्यातील पुरोगामी कार्यकर्त्यांनी दुपारी गांधी पुतळ्यासमोर या भ्याड हल्ल्याचा निषेध केला. यावेळी विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. ‘निषेध असो.. निषेध असो.. भ्याड हल्ल्याचा निषेध असो..’, जिंदाबाद, जिंदाबाद गोविंद पानसरे जिंदाबाद..’ अशा घोषणा दिल्या गेल्या. यावेळी ज्येष्ठ समाजवादी कार्यकर्ते रामकुमार रायवाडीकर, कॉ. ईश्वंभर भोसले, प्रा. अशोक नारनवरे, अॅड. डी. एन. भालेराव, शिवाजीराव शिंदे, प्रा. डॉ. श्रीराम गुंदेकर, संजय व्यवहारे, अण्णाराव क्षीरसागर, अंगद कांबळे, संजीवनी चिकाटे, संदीपान बडगिरे, सविता कुलकर्णी, गोविंद श्रुंगारे, नंदकुमार ढेकणे, संजय लाडके, वैजनाथ कोरे, केशव कांबळे, दगडू पडिले, प्रविण चिकाटे, दिगंबर सूर्यवंशी, पी. जी. देशपांडे, सूरज पाटील, बाळ होळीकर, पवन वडजे, सुनिता किरण, केतन वीरकर, प्रा. डॉ. संजय मोरे, प्रा, दिनकर भोसले, सुभाष सूर्यवंशी यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते़ जळकोट तालुक्यातील वांजरवाडा येथे कॉ़ गोविंद पानसरे व त्यांच्या पत्नीवर सोमवारी झालेल्या हल्ल्याचा भारतीय कम्युनिष्ठ पक्षाच्या वतीने केकतसिंदगी येथे निषेध करण्यात आला़ यावेळी राजू पाटील, गंगाधर गुणाले, अविनाश पागे, विठ्ठल चंदावार, देविदास पाटील, विश्वनाथ इंद्राळे उपस्थित होते़(प्रतिनिधी)
गोविंद पानसरे यांच्यावरील हल्ल्याविरुद्ध निदर्शने
By admin | Published: February 17, 2015 12:15 AM