लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : ‘ गॅस छोडो... चूल्हा जलाओ, मोटार छोडो... साइकिल चलाओ’ अशा मार्मिक घोषणा देत आज शहर काँग्रेसने क्रांतीचौकात निदर्शने केली.यावेळी खरोखरच चूल बनविण्यात आली होती. पेट्रोल व डिझेल दरवाढीच्या निषेधार्थ दोन बैलगाड्याही निदर्शनास आणण्यात आल्या होत्या. त्यावर घोषवाक्ये लिहून लक्ष वेधून घेण्यात येतहोते.शहर काँग्रेसचे अध्यक्ष नामदेव पवार यांच्या नेतृत्वाखाली ही निदर्शने करण्यात आली. केंद्र व राज्य सरकारच्या निषेधार्थ यावेळी घोषणाबाजी करण्यात आली. शहर महिला काँग्रेसच्या अध्यक्षा सरोज मसलगे पाटील, जिल्हा अध्यक्षा सुरेखा पानकडे पाटील, प्रदेश काँग्रेसचे पदाधिकारी समशेरसिंग सोधी, काँग्रेस सेवादलाचे शहराध्यक्ष आतिश पितळे, माजी नगरसेवक इब्राहिमभय्या पटेल, काँग्रेस एससी विभागाचे शहराध्यक्ष बाबा तायडे, प्रदेश महिला काँग्रेसच्या सरचिटणीस सुनीता तायडे- निंबाळकर, सरोज जेकब, विजया भोसले, अनिता भंडारे, जकिया बेगम, मथुरा साबळे, लतिफा बेगम, आकेफ रजवी, मुदस्सर अन्सारी, के. ए. पठाण, अनिल मालोदे, हरिभाऊ राठोड, जयपाल दवणे, जगन्नाथ काळे, प्रभाकर मुठ्ठे पाटील, खालेद पठाण, सचिन शिरसाठ, संतोष दीडवाले, मिलिंद सुरडकर, संजय जाधव, इकबालसिंग गिल, वैशाली तायडे, वर्षा पवार, रमाकांत मगरे, ललिता साळवे, अय्युब खान, सलीम इनामदार, प्रवीण केदार, पंकजा माने, वसंत वक्ते, राहुल सावंत, भाऊसाहेब जगताप, रॉबिन बत्तीसे, सुनीला साळवे, उत्तम दणके, किशोर ढेपे, हरचरणसिंग गुलाटी, अरुण नंदागवळी, अविनाश काळे यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्ते या आंदोलनात सहभागी झाले होते.यासंदर्भात बोलताना नामदेव पवार म्हणाले की, सध्या डिझेल, पेट्रोल व गॅसची प्रचंड दरवाढ झाली आहे. त्यात सातत्याने वाढच होत आहे. याचा फटका सर्वसामान्यांनाही बसत आहे. प्रत्येक वस्तूंची दरवाढ आणि पंतप्रधानांचे बाहेर देशाचे दौरे यात स्पर्धा लागली आहे. त्याचा बोजा सर्वसामान्यांवर पडत आहे. महाराष्टÑातील पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढीचा भुर्दंड सरकार जनतेवर लादत आहे. महाराष्टÑात इंधनावर विविध सेस लावले आहेत. त्यामुळे अन्नधान्य, दुधापासून सर्वच जीवनावश्यक वस्तूंच्या किमतीवाढत आहेत. या दरवाढीचा थेट परिणाम उद्योग- व्यवसायावरही होत आहे.
इंधन दरवाढीविरोधात ‘भडका’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2017 1:15 AM