सेवा सुरू ठेवण्याची मागणी : जिल्हाधिका-यांना निवेदनजालना : एकात्मिक पाणलोट व्यवस्थापन कार्यक्रमांतर्गत काम करीत असलेल्या पाणलोट व्यवस्थापन कर्मचा-यांची खंडित सेवा सुरू करण्यात यावी या व अन्य मागण्यांसाठी सोमवारी सकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले. या वेळी जिल्हाधिका-यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.मृदा व जलसंधारण विभागाच्या क्षेत्रीय रचनेमध्ये सात वर्षांचा पाणलोट प्रकल्पाचा अनुभव असणा-या व शैक्षणिक अर्हता पूर्ण करणाºया कर्मचा-यांची जिल्हा स्तरावरील सेवाज्येष्ठता यादी तयार करून समायोजन करावे, पाणलोट कर्मचा-यांना पुणे येथील वसुंधरा पाणलोट विकास यंत्रणेमार्फत नियुक्तीचे आदेश देण्यात यावे, जिल्हा पातळीवरील कर्मचा-यांची सेवापुस्तिका भरण्यात यावी, एक वर्षांपासून अधिक काळ काम करणा-या कर्मचा-यांना किमान वीस हजार वेतन द्यावे, थकित मानधन तात्काळ अदा करावे या मागण्या निवेदनात आहेत. पाणलोट व्यवस्थापन कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष मिलिंद घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या या आंदोलनात कृषितज्ज्ञ, समुदाय संघटक, उपजीविका तज्ज्ञ व अन्य कर्मचा-यांनी सहभाग घेतला.
पाणलोट व्यवस्थापन कर्मचा-यांचे धरणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 11:42 PM