शहरं
Join us  
Trending Stories
1
Sharad Pawar on Akshay Shinde Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: अक्षय शिंदेच्या एन्काऊंटरवर शरद पवारांचे ट्विट, काय म्हणाले?
2
"पुरावा नष्ट करण्याचा प्रयत्न आहे का?", बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार, विजय वडेट्टीवारांचा सवाल
3
CM Eknath Shinde on Akshay Shinde Encounter: "ज्याने माणुसकीला काळीमा फासला..."; CM एकनाथ शिंदे अक्षयच्या एन्काऊंटरवर स्पष्टच बोलले
4
अक्षय शिंदे आणि पोलिसांची चकमक ठाण्यात नेमकी कुठे झाली? Inside Story
5
Badlapur Case Accused Akshay Shinde, Police Encounter: बदलापूर अत्याचार प्रकरण: आरोपी अक्षय शिंदे पोलीस चकमकीत ठार! पोलिसांनी स्वसंरक्षणासाठी केला गोळीबार
6
बदलापूर प्रकरणातील आरोपी चकमकीत ठार! उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
7
अनिल अंबानी यांच्या मुलावर SEBI ची कारवाई; 'या' प्रकरणात ठोठावला कोट्यवधीचा दंड
8
"माझ्या पोराला पैसे देऊन मारून टाकलं", अक्षय शिंदेच्या आईचे गंभीर आरोप, दुपारीच घेतली होती भेट
9
भारतात मंकीपॉक्सचा रुग्ण आढळला, क्लेड १ बी व्हायरसची लागण, आरोग्य यंत्रणा सतर्क
10
रोहित पवारांना राम शिंदेंचा धक्का! कर्जत-जामखेडमधील दोन नेते भाजपात
11
Badlapur Case Accused Akshay Shinde: बदलापूर शालेय मुलींवर अत्याचार प्रकरण: मुख्य आरोपी अक्षय शिंदेचा आत्महत्येचा प्रयत्न; प्रकृती गंभीर
12
विशेष लष्करी रेल्वे गाडीखाली स्फोटके ठेवल्या प्रकरणी RPF ने एकाला घेतले ताब्यात
13
'या' दिवसापासून भाजप राबवणार मेगा सदस्यत्व अभियान, एक कोटी लोकांना जोडण्याचे लक्ष्य
14
"लहान आणि मोठे हुड्डा यांच्यात लढाई सुरू आहे...", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल, कुमारी सैलजा यांच्यावरही निशाणा
15
इस्रायलचे हिजबुल्लाहच्या अनेक ठिकाणांवर हवाई हल्ले, 100 ठार तर 400 जखमी
16
“शेतकऱ्यांमुळे नरेंद्र मोदी पंतप्रधान, पण सत्तेत येताच त्यांना उद्ध्वस्त करायचे धोरण”: नाना पटोले
17
अजिंक्य रहाणेनं CM शिंदेंसह अजित पवार अन् फडणवीसांचे मानले खास आभार; जाणून घ्या कारण
18
“जनतेचे प्रश्न सोडवण्यात भाजपा महायुती सरकार अपयशी, फक्त पैसा वसुली...”: रमेश चेन्नीथला
19
मनोज जरांगेंची मागणी योग्यच, आमचा त्यांना पाठिंबा, पण...; शरद पवारांनी स्पष्ट केली भूमिका
20
शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी: दुधाच्या अनुदानात वाढ; मंत्रिमंडळ बैठकीत २३ मोठे निर्णय

शांततेत आंदोलन करा, नेत्यांच्या फराळाच्या कार्यक्रमाला जाऊ नका; जरांगे पाटलांचे मराठा समाजाला आवाहन

By ऑनलाइन लोकमत | Published: November 11, 2023 11:34 AM

राज्यात शांततेत आंदोलन करण्याचे आवाहन जरांगे पाटील यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर  - राज्यभरात गेल्या काही दिवसांपासून मराठा आरक्षासाठी आंदोलन सुरू आहे, जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला २४ डिसेंबरपर्यंत वेळ दिला आहे. तर आता दुसरीकडे मनोज जरांगे पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्र दौरा सुरू करणार आहेत. या पार्श्वभूमीवर जरांगे पाटील यांनी मराठा समाजाला आवाहन केलं.१ डिसेंबरपासून सर्वांनी साखळी उपोषण करायचं आहे. राज्यभरात सर्वांनी शांततेत आंदोलन करा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

उद्धव ठाकरेंच्या दौऱ्याआधी ठाण्यातील वातावरण तापलं, शहरातील बॅनर फाडले;पोस्टर फाडल्याचा व्हिडीओ जितेंद्र आव्हाडांनी ट्विट केला

मनोज जरांगे पाटील म्हणाले, राज्यातील मराठा समाजाने जीवंत राहूनच लढले पाहिजे. गोरगरिब मराठ्यांना न्याय देण्यासाठी लढा. कुणीही आत्महत्या करु नका. २४ डिसेंबरनंतरच्या आंदोलनाची तयारी करा, साखळी उपोषण ताकदीने उभा राहिले पाहिजे. आपल्या जिल्ह्यात प्रत्येकाने जाऊन सांगा. १ डिसेंबरला सर्वांनी साखळी उपोषण करा. तसेच जर तुम्ही नेत्यांच्या घरी फराळासाठी जाणार असाल तर तुम्ही त्यांनी मराठा समाजासाठी काय केलं हे विचारा, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

"तुम्ही आजपासून मराठा समाजासाठी समाजाच्या पाठिमागे उभे रहा, असं नेत्यांना सांगा. तुम्ही पक्षाला, नेत्याला मोठं करण्यासाठी आपल्या पोरांच वाटोळ करुन गेऊ नका. नेत्यांच्या फराळाला जाऊच नका, असं आवाहनही जरांगे पाटील यांनी केलं. आम्ही ओबीसी समाजाच्या सोबत आहोत, त्यांच्यातील नेत्यांच्या विरोधात आहोत, समाजाच्या विरोधात नाही, असंही मनोज जरांगे पाटील म्हणाले. 

धनगर, मुस्लीम आणि मराठा समाजाचे एकच दुखणे : मनोज जरांगे-पाटील

धनगर, मुसलमान आणि मराठा समाजाचे एकच दुखणे आहे. या समाजांनी नेत्यांच्या मागे न लागता आपल्या मुलांच्या हितासाठी एकत्र यावे, मागण्या पदरात पाडून घेण्यासाठी जोरदार लढा द्यावा लागणार आहे, असे मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी शुक्रवारी पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.  मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी काय कार्यवाही करणार आहेत, याबाबतचा लिखित बॉण्ड राज्य सरकारकडून जरांगे पाटील यांना दिला जाणार आहे. त्यासाठी सरकारचे शिष्टमंडळ छ. संभाजीनगरमध्ये येणार आहे. याविषयी त्यांना विचारले असता, मुख्यमंत्री कार्यालयाकडून फोन आला होता, सरकारचे शिष्टमंडळ येणार म्हणून. मात्र, दोन-तीन दिवस राज्य सरकार विविध कामांत व्यग्र असल्याने शिष्टमंडळ आले नसेल. मात्र, मुद्दामहून जर टाळाटाळ होत असेल, तर  वेगळा विचार करावा लागेल, असा इशारा त्यांनी दिला.   

टॅग्स :Manoj Jarange Patilमनोज जरांगे-पाटीलMaratha Reservationमराठा आरक्षण