सकल मराठा समाजाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयाच्या विरोधात नसून राज्यकर्त्याच्या विरोधात हा रोष असल्याचे सांगत बजाजनगरात फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करीत काळे झेंडे दाखवून निषेध केला. सत्ता येऊन प्रत्येक पक्षाने कुचकामी आरक्षण देऊन समाजाची बोळवण केल्याचा आरोप सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. राज्य व केंद्र शासनाने मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी प्रयत्न करण्याची आवश्यकता असून,
ओबीसीमध्ये मराठा समाजाचा समावेश करण्याची मागणी केली. आंदोलनात वाळूजमहानगर सकल मराठा समाजाचे नितीन देशमुख, डॉ. ज्ञानेश्वर पाटील निळ, उमेश दुधाट, दीपक गायकवाड, दिनेश दुधाट, राजू शेरे, औंदुबर देवडकर, पोपट तांगडे, विक्रम आळंजकर, गजानन खाडे, पंकज गावंडे, शंकर गरुड आदींनी सहभाग घेतला होता.
फोटो ओळ
मराठा आरक्षण रद्द झाल्याच्या निषेधार्थ बजाजनगरात सकल मराठा समाजातर्फे काळे झेंडे दाखवून निषेध करण्यात आला.