शहरं
Join us  
Trending Stories
1
सुधीर साळवींना उमेदवारी नाकारल्याने शिवडीत ठाकरे गटात नाराजी, राजीनामा देण्याची तयारी
2
महायुतीचा २७८ जागांचा फॉर्मुला ठरला; देवेंद्र फडणवीसांनी काढला मविआला चिमटा
3
काँग्रेसची ४८ जणांची पहिली उमेदवार यादी जाहीर; अनेक बड्या नेत्यांचा समावेश 
4
जस्टीस संजीव खन्ना होणार देशाचे पुढील सरन्यायाधीश; 11 नोव्हेंबरला पदभार स्वीकारणार...
5
"...तर मी येवल्यातून भुजबळांविरोधात निवडणूक लढवेन", सुहास कांदेंना शिंदे-फडणवीसांचा मेसेज काय?
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : राष्ट्रवादीची पहिली यादी जाहीर; भाजपामधून आलेल्या तिघांना शरद पवारांनी दिली उमेदवारी
7
"त्यांचा इतिहासच गद्दारीचा, आईबापासोबतही..."; छगन भुजबळांचा कांदेंनी काढला इतिहास
8
गुलमर्गमध्ये लष्कराच्या वाहनावर दहशतवादी हल्ला, 5 जवान जखमी तर एका साथीदाराचा मृत्यू
9
अयोध्येतील 55 घाटांवर 28 लाख दिव्यांची रोषणाई; झळाळून निघणार श्रीराम जन्मभूमी...
10
'भ्रष्टाचार, गुन्हेगारी वाढली', उमेदवारी मिळताच युगेंद्र पवारांनी काकाविरोधात थोपाटले दंड
11
'मविआ'त सांगोला मतदारसंघ कोणाला? जयंत पाटील म्हणाले, "एक-दोन दिवसात..."
12
ना हडपसर, ना खडकवासला...ठाकरे गटात प्रवेश केलेले वसंत मोरेंचा पुढचा प्लॅन ठरला
13
इम्तियाज जलीलांची वेगळीच खेळी; ३ विधानसभा मतदारसंघातून घेतले अर्ज, लोकसभाही लढणार
14
NCP SP Candidate List : राष्ट्रवादी काँग्रेसची (शरद पवार) पहिली यादी जाहीर! कोणाची नावे?
15
पुण्यात ठाकरे गट बंडखोरी करणार?; हडपसर जागेवर राष्ट्रवादीचा उमेदवार ठरला, तर...
16
कोरेगावमधून शशिकांत शिंदे; कऱ्हाड दक्षिणमधून अतुल भोसले यांनी भरला अर्ज 
17
शरद पवार गटाची पहिली यादी जाहीर; मराठवाड्यात कुणाला संधी? पाहा...
18
बारामतीत हाय व्होल्टेज सामना रंगणार: शरद पवारांकडून युगेंद्र पवारांना उमेदवारी; अजितदादांना भिडणार!
19
शिवडीत अजय चौधरींनाच पुन्हा उमेदवारी; मातोश्रीच्या बैठकीत उद्धव ठाकरेंचा निर्णय
20
"मला प्रेम करायचंय..."; वयाच्या २२ व्या वर्षीच 'या' अभिनेत्रीने केलंय फॅमिली प्लॅनिंग

इंदिरा गांधींनी विमानतळावर दिली उमेदवारी; नवख्या अशोक डोणगावकरांनी मारली बाजी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 24, 2024 4:23 PM

आठवणीतील निवडणूक १९८०: पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी विमानतळावर जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली.

- जयेश निरपळगंगापूर : विधानसभेची १९८०मध्ये झालेली निवडणूक गंगापूरकरांच्या कायम लक्षात राहील, अशी होती. तेव्हा पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी औरंगाबाद विमानतळावर आपला जाहीर केलेला उमेदवार बदलून नवख्या अशोक पाटील डोणगावकर यांना उमेदवारी दिली आणि डोणगावकर हे एस. काँग्रेसचे विद्यमान आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ यांचा पराभव करून वयाच्या ३७व्या वर्षी आमदार झाले.

वाहेगावचे ॲड. लक्ष्मणराव मनाळ दादा व डोणगावचे अशोक पाटील डोणगावकर दादा या दोन ‘दादां’मध्ये १९८० मध्ये झालेली विधानसभा निवडणूक लक्षवेधी आणि तेवढीच रंजक झाली होती. या निवडणुकीत एस. काँग्रेसच्या वतीने विद्यमान आमदार ॲड. लक्ष्मणराव मनाळ मैदानात होते, तर इंदिरा काँग्रेसच्या वतीने हर्सूल सावंगीचे (लासूर स्टे.) तत्कालीन सरपंच डॉ. बाबुराव पवार यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली होती. याच दरम्यान देशाच्या पंतप्रधान इंदिरा गांधी प्रचारासाठी औरंगाबाद विमानतळावरून इतरत्र रवाना होताना जालन्याचे तत्कालीन खासदार बाळासाहेब पवार यांनी इंदिरा गांधी यांच्याकडे गंगापूरची उमेदवारी बदलण्याची मागणी केली व अशोक पाटील डोणगावकर यांच्या नावाची शिफारस केली. गांधी यांनी पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्षा प्रेमलाकाकी चव्हाण (माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या आई) यांना सांगून उमेदवारी त्वरित बदलली आणि यानंतर प्रत्यक्ष झालेल्या निवडणुकीत अशोक पाटील डोणगावकर यांनी पक्षश्रेष्ठींसह वरिष्ठ आणि इंदिरा गांधी यांनी दाखवलेला विश्वास सार्थ ठरवून विद्यमान आमदार ॲड. मनाळ यांचा ७ हजार ८५ मतांनी पराभव केला. या निवडणुकीत डोणगावकर यांना २३ हजार १२६, तर मनाळ यांना १६ हजार ४१ एवढी मते मिळाली तसेच सीपीआयचे जोरावर जल्लूमामू यांना ६ हजार ६४४ आणि अपक्ष पारसकुमार ठोळे यांना ७ हजार ३८३ मते मिळाली होती.

पहिल्यांदाच राजकारणात प्रवेशया निवडणुकीच्या माध्यमातून डोणगावकर घराण्याचा पहिल्यांदाच राजकारणात प्रवेश झाल्याने डोणगावकर घराण्यासाठी ही निवडणूक संस्मरणीय ठरली. यानंतर १९८४ साली औरंगाबाद लोकसभेच्या निवडणुकीत अशोक डोणगावकर यांचे नातू साहेबराव पाटील डोणगावकर हे खासदार झाले होते. १९९५च्या विधानसभा निवडणुकीत अशोक पाटील डोणगावकर हे अपक्ष निवडून येत दुसऱ्यांदा आमदार, तर पहिल्यांदाच मंत्री झाले होते. त्यांच्या रुपाने मतदारसंघाला आतापर्यंत केवळ एकदाच मंत्रिपदाची संधी मिळाली आहे.

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४gangapur-acगंगापूरmarathwada regionमराठवाडा महाराष्ट्र विधानसभा निवडणूकcongressकाँग्रेसIndira Gandhiइंदिरा गांधी