डॉ. अग्रवाल म्हणाले की, आतापर्यंत छाबडा यांच्या कथा हिंदीतूनच असायच्या. परंतु आता मराठी भाषेतूनही या कथांचा आस्वाद घेणे मराठी भाषिकांसाठी आनंददायी असणार आहे.
हिंदीत बरेच लिखाण केले, पण इतकी वर्षे महाराष्ट्रात राहूनही मराठी भाषेतील माझे एकही पुस्तक नव्हते, ही बाब मला नेहमीच खटकायची. त्यामुळेच लेखिका माया महाजन यांच्याकडून मी माझ्या काही हिंदी कथांचा अनुवाद करून घेतला, अशा शब्दांत नरेंद्रकौर यांनी मनोगत मांडले.
इंद्रधनुष्यमधील सर्वच ८० कथा प्रभावी असून, खरेपणाचे जवळून दर्शन घडविणाऱ्या आहेत. आपल्या आसपास घडणाऱ्या घटनाच या कथा संग्रहात अत्यंत बारकाईने टिपलेल्या आहेत. काही कथा अत्यंत मार्मिक असून, हृदयाला भिडणाऱ्या आहेत, अशा भावना महाजन यांनी व्यक्त केल्या.
दरम्यान, कार्यक्रमाच्या सुरुवातीला आरती बियानी यांनी पाहुण्यांचे स्वागत केले. कुलदीप सिंह छाबडा, डॉ. जसमीत सिंह, डॉ. राखी अग्रवाल, दीपिका भंडारी, डॉ. प्राजक्ता देशमुख, जसमीन छाबडा, सुमन कोटगिरे, सनवीर छाबडा, अरुणा बियानी, शांता जायस्वाल, मेहर, योगेश्वर, नमनदीप आदींची यावेळी उपस्थिती होती.
फोटो ओळ :
इंद्रधनुष्य कथा संग्रहाचे प्रकाशन डॉ. संतोष अग्रवाल, प्रा. सदाशिव देशमुख, कुलदीपसिंह छाबडा, नरेंद्र कौर छाबडा, माया महाजन, सुशील अग्रवाल यांच्या हस्ते करण्यात आले.