याशिवाय दरवर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात विविध खाजगी संस्था, उद्योग-व्यवसाय, पतसंस्था, कार्यालये, महाविद्यालये यांच्याकडून त्यांच्या संस्थेची माहिती असणारे कॅलेंडर छपाईसाठी दिले जातात. एकेका संस्थेकडून कमीत कमी ५०० ते ५००० एवढे कॅलेंडर छापले जातात आणि नववर्षाच्या शुभेच्छा देताना ते वाटले जातात; परंतु यंदा कोरोनामुळे आर्थिक घडी विसकटल्याने अनेक संस्थांनी कॅलेंडर छपाई करण्याचा अनावश्यक खर्च टाळला. त्यामुळे शहरातील कॅलेंडर छपाईचा व्यवसाय यंदा अवघ्या १० ते १५ टक्क्यांवर आला. लग्नपत्रिकाही नाही आणि कॅलेंडरही नाही, यामुळे कमाईचा मुख्य हंगाम हातून निसटून गेल्याचे व्यावसायिक माजेद शेख यांनी सांगितले.
चौकट :
अवघा १० ते १५ टक्के व्यवसाय
४०-४५ वर्षांच्या अनुभवात प्रकाशन व्यवसाय पहिल्यांदाच एवढा कमी झाला आहे. आजवर वर्षाकाठी १०० ते १२५ पुस्तकांचे प्रकाशन व्हायचे. ते यावर्षी आतापर्यंत अवघ्या १० ते १५ पुस्तकांवर आले आहे. गतवर्षीच्या तुलनेत २५ टक्के व्यवसाय झाला तरी खूप झाले, अशी सध्याची अवस्था आहे. असेच काहीसे पुस्तकांच्या विक्रीबाबतही आहे. दरवर्षीच्या तुलनेत ऑनलाइन विक्रीही खूप कमी झालेली आहे, असे साहित्यिक बाबा भांड यांनी सांगितले, तर लॉकडाऊननंतरचे ५-६ महिने पुस्तक खरेदी-विक्री आणि प्रकाशन या सर्वच बाबतीत अवघड गेले. आता पुन्हा प्रकाशन व्यवसाय आणि पुस्तक विक्री पूर्वपदावर येऊ पाहत असल्याचे प्रकाशक श्याम देशपांडे यांनी नमूद केले.