लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यातील नागरिकांना पासपोर्ट काढण्यासाठी आता पुण्याला किंवा सोलापूरला जावे लागणार आहे. तशी अधिसूचना भारत सरकारच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या पुणे क्षेत्रिय पासपोर्ट कार्यालयाने काढली आहे.सोलापूर येथील पासपोर्ट कार्यालय पुणे येथील क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधीन आहे. त्यामुळे जालना जिल्ह्यातील नागरिक आता पुण्यासह सोलापूरच्या लघु पासपोर्ट सेवा केंद्रातून पासपोर्ट काढण्यासह नूतनीकरण करू शकतील. पूर्वी जालना जिल्हा नागपूर क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाच्या अधीन होते.प्रवास खर्च, वेळ या दृष्टीने नागपूरला जाणे येथील नागरिकांसाठी गैरसोयीचे होते. या व्यतिरिक्त मराठवाड्यातील लातूर, उस्मानाबाद, बीड, परभणी, नांदेड हे जिल्हे पुण्याच्या क्षेत्रीय पासपोर्ट कार्यालयाशी जोडण्यात आले असल्याचे पुणे क्षेत्रीय पासपोर्ट अधिकारी अतुल गोतसुर्वे यांनी प्रसिद्ध पत्रकाद्वारे कळविले आहे.
पासपोर्टसाठी जावे लागणार पुण्याला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:36 AM