शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
"तुम्ही हर-हर महादेव म्हणत संघटित तर होऊ शकत नाही, मग अल्लाह हू अकबर म्हणत..."; मनोज मुंतशिर भडकले
3
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
4
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
5
दुर्गम भाग, सुरक्षा व्यवस्था नाही...दहशतवाद्यांनी हल्ल्यासाठी पहलगाम का निवडले?
6
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
7
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
8
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
9
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
10
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
11
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
12
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
13
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
14
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
15
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
16
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
17
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
18
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
19
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
20
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं

पुन्हा उसवतेय गणगोत सारं! झाडांवरील घरटे गायब, रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांना कोण वाचविणार?

By संतोष हिरेमठ | Updated: August 6, 2024 18:28 IST

झाडांवर कुऱ्हाडचे घाव मारण्यापूर्वी घरटे गायब करण्याचा प्रकार, २०१५ मधील पुनरावृत्ती?

छत्रपती संभाजीनगर : रेल्वेस्टेशन परिसरातील झाडांवरील बगळ्यांचे गणगोत पुन्हा उसवत असल्याची धक्कादायक परिस्थिती समोर आली आहे. रेल्वेस्टेशनच्या नव्या इमारतीचे बांधकाम सुरू झाले आहे. बांधकामाच्या जागेतील झाडे तोडण्यासाठी परवानगी आवश्यक आहे आणि ही परवानगी सहजतेने मिळावी, यासाठी झाडांवरील बगळ्यांच्या घरट्यांना गायब करण्याचा प्रकार सुरू आहे. त्यातूनच उडूही न शकणारी बगळ्यांची पिलं जमिनीवर ‘सैरभैर’ अवस्थेत पहायला मिळत आहेत. जणू ‘आम्हाला कोणी वाचविणार का’ अशी सादच ही पिलं घालीत आहेत.

छत्रपती संभाजीनगर रेल्वेस्टेशनचा ३५९ कोटी रुपयांच्या निधीतून पुनर्विकास करण्यात येत आहे. शहराच्या दळणवळण क्षेत्रासाठी हा मैलाचा दगड ठरणार आहे. मात्र, स्टेशनचा पुनर्विकास करताना झाडांवर कुऱ्हाड पडून शेकडो पक्षी बेघर होत असल्याची स्थिती आहे. काही झाडे अगदी इमारतीला आणि प्लॅटफार्मला लागून आहेत. ही झाडे तोडण्यासाठी त्यावरील घरटी, पक्षी इतरत्र हलविण्याचा प्रकार सुरू असल्याची माहिती सूत्रांनी दिली. यातून काही घरटी, पिलं खाली पडली आहे. ही पिलं रेल्वेस्टेशन परिसरात भयभीत होत फिरत असल्याची स्थिती आहे. दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागाच्या व्यवस्थापक (डीआरएम) नीती सरकार यांच्याशी वारंवार संपर्क साधला. मात्र, त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही.

काय घडले होते २०१५ मध्ये?ऑगस्ट २०१५ मध्ये रेल्वेस्टेशनवरील पार्किंगमध्ये वाहनांवर पक्ष्यांची विष्ठा पडत असल्याची काहींनी तक्रार केली होती. त्यावरून पक्ष्यांची घरटी असलेली झाडे तोडण्यात आली. त्यातून झाडांवरील घरटी खाली पडली आणि अनेक बगळ्यांचा जीव गेला.

आम्ही स्थलांतरित करतोय हो?रेल्वेस्टेशनवरील बगळ्यांची परिस्थिती ‘लोकमत’ प्रतिनिधी, छायाचित्रकार टिपत होते. त्यावरील इमारतीच्या बांधकामावर देखरेख करणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘आम्ही बगळ्याची घरटी, पक्षी स्थलांतरित करीत आहोत’, असे सांगितले. मात्र, कुठे स्थलांतरित केले जात आहे, हे सांगितले नाही.

घरटी, बगळे वाचावेझाडांवर घरटी असेल ते झाड तोडता येत नाही. पक्ष्यांची घरटी इतरत्र स्थलांतर करता येत नाही. घरटी स्थलांतरांचा प्रयत्न कुणी केला तरी पक्ष्यांच्या जीवासाठी ते योग्य होत नाही. सध्या पक्ष्यांचा विणीचा काळ आहे. अशा काळात झाडे तोडता कामा नये. घरटी असेल तर झाडे वाचविलेच पाहिजे. रेल्वेस्टेशनवर २०१५ च्या घटनेची पुनरावृत्ती होऊ नये.- किशोर पाठक, मानद वन्य जीव रक्षक

वन विभागाशी संपर्क, ‘एनजीओ’च्या मदतीने स्थलांतरपार्सल कार्यालयाच्या ठिकाणी दोन झाडांमध्ये एग्रेट पक्षी राहतात. या पक्ष्यांना स्थलांतरित करण्यासाठी आम्ही वन अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यांनी या क्षेत्रातील तज्ज्ञ असलेल्या ‘एनजीओ’ची माहिती प्रदान केली. आम्ही त्या ‘एनजीओ’च्या मदतीने गत आठवड्यात अनेक पक्षी आणि अंडी इतर झाडावर यशस्वीरीत्या स्थलांतरित केली.- नीती सरकार, विभागीय रेल्वे व्यवस्थापक (डीआरएम), ‘दमरे’

परवानगी दिलेली नाहीरेल्वेस्टेशनवरील झाडे तोडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही, असे महापालिकेचे उद्यान अधीक्षक विजय पाटील यांनी सांगितले. पक्ष्यांची घरटी नष्ट केल्यानंतर ही परवानगी मागण्यात येणार असल्याची माहिती रेल्वेस्टेशनवरील सूत्रांनी सांगितले.

टॅग्स :AurangabadऔरंगाबादAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनenvironmentपर्यावरण