सिल्लोड शहरात प्लास्टिक बंदीचा निर्णय बऱ्याच दिवसांपासून घेण्यात आलेला आहे. नगर परिषदेची ही पहिली कारवाई नसून यापूर्वीही नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आलेली आहे. शहर स्वच्छ व पर्यावरण संवर्धनासाठी शहरातील प्रत्येक नागरिकाने प्लास्टिक बंदीचा नियम पाळवा, असे आवाहन मुख्याधिकारी सय्यद रफिक यांनी केले आहे. ही कारवाई नगर परिषदेचे मुख्याधिकारी सय्यद रफिक, पोलीस निरीक्षक राजेंद्र बोकडे, उपमुख्याधिकारी अजहर पठाण, प्रशासकीय अधिकारी अजगर पठाण, सुनील गोरडे, प्रकल्प समन्वयक देवेंद्र सूर्यवंशी, अलका सूर्यवंशी, सुनीता आरके, शेख अजीम, अनवर पठाण, गोरख धाडगे, दीपक दाभाडे, विलास तावडे आदींसह नगर परिषद कर्मचारी तसेच पोलिसांनी केली.
फोटो : कॅप्शन सिल्लोड येथे प्लास्टिक पिशव्या वापरणाऱ्या दुकानांवर सिल्लोड नगर परिषदेने दंडात्मक कारवाई केली.