भद्रामारूती संस्थांनच्या वतीने लाऊडस्पीकरद्वारे नागरिकांना मास्क वापरण्याच्या सूचना करण्यात येत आहे. तरीपण काही भाविक विना मास्क मंदिर परिसरात फिरताना आढळून येत आहेत. त्यामुळे प्रशासनाच्या वतीने मागील दोन दिवसांपासून भद्रा मारुती मंदिर परिसरात दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. तसेच कॅरीबॅग वापरणाऱ्या दुकानदारांना दंड देऊन समज देण्यात आली. व पुढील वेळेस कॅरीबॅग आढळल्यास पाच हजार रुपये दंड आकारण्यात येईल, अशा कडक सुचना न.प.ने दिल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक संभाजी वाघ यांनी दिली आहे.
सदरची कारवाई नायबतहसीलदार एस. बी. देशमुख कार्यालयीन अधिक्षक संभाजी वाघ,
करनिरीक्षक प्रमोद पाटील, पोलीस कॉंस्टेबल जाकीर शेख, नगरपरिषद कर्मचारी सतीश देवरे ,लक्ष्मण शेजुळ तलाठी के. सी. कुलकर्णी यांच्या पथकाने केली. पुढील काही दिवस ही कारवाई अशीच सुरु राहणार असून नागरिकांनी मास्क वापरावे, असे आवाहन नायब तहसीलदार एस. बी. देशमुख यांनी केले आहे.
फोटो कॅप्शन : खुलताबाद येथे विनामास्क व कॅरीबॅग वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करतांना पथक.
220221\sunil gangadhar ghodke_img-20210222-wa0089_1.jpg
खुलताबाद येथे विनामास्क व कॅरीबॅग वापरणाऱ्याविरुद्ध कारवाई करतांना पथक.