शहरं
Join us  
Trending Stories
1
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
2
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
3
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
4
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
5
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
6
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
7
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
8
Jammu and Kashmir : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये मोठा दहशतवादी हल्ला; पर्यटकांवर केला गोळीबार, २ जण जखमी
9
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?
10
दहशतवाद्यांनी आधी धर्म विचारला, नंतर झाडल्या गोळ्या, पहलगाम हल्ल्यातील जखमींचा धक्कादायक दावा   
11
'नरेंद्र मोदी जगातील सर्वात लोकप्रिय नेते', जेडी व्हेन्स यांनी केले पंतप्रधानांचे कौतुक...
12
IPL 2025: हर्षा भोगलेंना KKRच्या मॅचमधून मुद्दाम वगळलं? खुद्द त्यांनीच दिलं स्पष्टीकरण
13
तेव्हा सलग १७ वर्षे घटत होते सोन्याचे दर, झालं होतं एवढं स्वस्त, मात्र आता...  
14
जालना: बॉयफ्रेंडकडून बदनामीच्या धमक्या, १८ वर्षीय तरुणीने संपवलं आयुष्य, मृतदेह कुठे सापडला?
15
टेबल फॅन खूपच खराब झालाय? स्वच्छ करण्यासाठी पाहा 'ही' सोपी पद्धत, पंखा दिसेल नव्यासारखा
16
नरेंद्र मोदींचं विमान सौदी अरेबियाच्या हवाई हद्दीत प्रवेश करताच घडलं असं काही, सारेच अवाक्
17
सलग सहाव्या दिवशी बाजार तेजीत बंद; 'या' बँकांच्या शेअर्सने खाल्ला भाव; कोणत्या सेक्टरमध्ये घसरण?
18
बापरे! सासू अन् जावयानंतर आता विवाहित महिला १५ वर्षाच्या मुलासोबत फरार, प्रकरण काय?
19
सोन्यानं पार केला १ लाखांचा टप्पा, शक्ती कपूरनं ३५ वर्षांपूर्वीच केलेली भविष्यवाणी; व्हिडीओ व्हायरल
20
'२३७ जागा मिळल्याचा माज करू नका, शिंदेंमुळे त्या मिळाल्या', शिवसेना आमदार कदमांचा अतुल सावेंवर पलटवार

अपहरणासाठी बिहारीकडून पिस्तुलाची खरेदी; वाळू माफिया होण्यासाठी गुन्हेगारी विश्वात प्रवेश

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2025 13:01 IST

वाळू माफिया होण्याच्या स्वप्नातून गुन्हेगारी विश्वात प्रवेश, पोलिसांना चकवा देण्यासाठी खऱ्या बलेनो कारच्याच क्रमांकाचा वापर

छत्रपती संभाजीनगर : एन-४ मधील अपहरणनाट्याचे हर्षल शेवत्रे व शिवराज गायकवाड मुख्य सूत्रधार आहेत. हर्षलचे काही महिने एन-४ मधील एका लहान मुलांच्या शाळेजवळ वास्तव्य होते. त्याच दरम्यान त्यांनी चैतन्य तुपेला हेरले. विशेष म्हणजे, बिहारच्या राजन नामक व्यक्तीकडून त्यांनी उच्च दर्जाच्या पिस्तुलाची ३० हजारांत खरेदी केली होती.

पुण्याला कार्यरत असताना खोलीवरील मित्रांचे उत्पन्न चांगले होते. मात्र, सेंट्रिंगचे काम करूनही हर्षल समाधानी नव्हता. हे पाचही आरोपी जाफ्राबाद तालुक्यातील ब्रह्मपुरी गावातील रहिवासी असून, बालमित्र आहेत. शिक्षणासाठी शहरात असलेल्या प्रणवने एन-४ मध्ये भाडेतत्त्वावर खोली घेतली होती. तेथेच हर्षलचा अनेक दिवस मुक्काम होता. चैतन्य शाळेतून कधी येतो, त्याचे घर कसे आहे, खेळायला बाहेर कधी येतो, कोणासोबत खेळतो, घरात कोण कोण असते, या प्रत्येक बारकाव्याचा त्यांनी तीन महिने अभ्यास केला. त्यानंतर अपहरणाच्या दहा दिवसांपूर्वी टीव्ही सेंटरजवळ स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या कृष्णा पठाडेच्या खोलीवर वास्तव्यास असताना अपहरणाच्या कटाला आरोपींनी मूर्त रूप दिले.

आरोपींचा परिचय- हर्षल पुण्यात सेंट्रिंगचे काम करतो.- जीवन पुण्यातील काम सोडून नुकताच गावात परतला.- शिवराज ऊर्फ बंटी जेसीबी चालवितो.- प्रणव बीसीएसच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी.- कृष्णा स्पर्धा परीक्षेची तयारी करतो.

तीनदा फसला प्रयत्न, चौथ्यात यशस्वी२६ जानेवारी रोजी सर्वजण कृष्णाच्या खोलीवर राहण्यास आले. त्यानंतर २७, २८, ३१ जानेवारी व १ फेब्रुवारी रोजी त्यांची कार हायकोर्ट परिसर ते चैतन्याच्या घरापर्यंत सीसीटीव्हीत कैद झाली आहे. तेव्हा त्यांचा अपहरणाचा प्रयत्न अयशस्वी राहिला. दि. ४ फेब्रुवारी रोजी मात्र सोसायटीच्या दुसऱ्या दिशेने नेत कार रस्त्याच्या दिशेने उभी केली, अशाप्रकारे चैतन्यच्या घरासमोरून ते आले. सायकलच्या एक राउंडची मागणी करत एकाने चैतन्यकडून सायकल घेतली. चॉकलेटचे आमिष दाखवत त्याला कारमध्ये बळजबरीने बसविले.

‘राजन’ सहावा आरोपीपुण्यात कामादरम्यान हर्षलची बिहारच्या राजन नामक व्यक्तीसोबत ओळख झाली होती. त्यानेच पिस्तूल दिल्याचे हर्षलने सांगितले. गुन्हे शाखेचे एक पथक पुण्याला जाऊन आले. मात्र, तो मिळून आला नाही.

बंद सिमकार्ड ‘रिॲक्टिव्ह’ केलेखंडणीच्या मागणीसाठी हर्षलने फेब्रुवारी, २०२३ मध्ये यूपीच्या रुमपार्टनकडून सीम घेतले होते. वर्षभर ते बंद असल्याने हर्षलने २ फेब्रुवारी ‘रिॲक्टिव्ह’ केले. त्यासाठी एक जुना मोबाइल घेतला. त्यावरून फक्त चैतन्याच्या वडिलांना एक कॉल व कंपनीचे सर्व्हिस वेलकमचे ३ मेसेज नोंद आहेत.

वाळू माफिया होण्याचे स्वप्नातून गुन्हेगारी विश्वात प्रवेशपाचही आरोपी बालमित्र आहेत. सख्खे मामेभाऊ असलेल्या हर्षल व शिवराजची वाळूमाफियांमध्ये उठबैस असायची. त्यामुळे त्यांचेही असंख्य जेसीबी, हायवा घेऊन वाळूमाफिया होण्याचे स्वप्न होते. हातावर वाळू माफियाचा ‘टॅटू’देखील गोंदविला होता. त्यातून त्यांची सातत्याने कमी वेळेत पैसे कमविण्याची इर्षा वाढत गेली. त्यातूनच पुढे पिस्तूल खरेदी करून त्यांनी थेट गुन्हेगारी विश्वात प्रवेश केला.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीKidnappingअपहरण