औरंगाबाद : चोरी, हाणामारी रोखण्यासाठी सुरुवातीपासून पोलीस ठाणे तसेच आयुक्तालयाच्या हद्दीत रात्रीची गस्त घालण्यासाठी पोलीस यंत्रणा कार्यरत आहे. परंतु आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून हजेरी बुक आता क्यूआर कोडमध्ये बदलले असून, प्रत्यक्ष संबंधित ठिकाणी गेल्याशिवाय मोबाइलवर लोकेशन स्कॅन होणार नसल्याची यंत्रणा उभारण्यात आली आहे.
आाधुनिकीकरणात होणारे बदल आता सर्वांना स्वीकारावे लागत आहे. पोलीस यंत्रणा देखील जुन्या पद्धतीत काही तरी नवीन नवीन प्रयोग करीत आहे. शहर कॅमेऱ्यांच्या नजरेत जोडले असून, त्यासोबतच पोलीस गस्त ही त्याच दृष्टीने पारदर्शक असावी. जेणेकरून गुन्हेगारीवर आळा घालता येईल. त्यासाठी तत्कालीन गृहमंत्र्यांच्या उपस्थितीत क्यूआर कोड संकल्पनेचे उद्घाटन एसीपी सुरेश वानखेडे यांच्या उपस्थितीत केले होते. आता आयुक्तालयाच्या हद्दीत पोलीस ठाण्याच्या अंतर्गत भेटीच्या ठिकाणे क्यूआर कोड तयार केले आहेत. एका ठाण्याच्या हद्दीत किमान ४० क्यूआर कोड तयार केले आहेत.
स्वत:चा फोटो आणि गाडीला असलेले जीपीआरएस याचे सर्वच नियंत्रण पोलीस ठाणे तसेच आयुक्तालय आणि गुन्हेशाखेकडे आहे.
सातारा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील बहुतांश ठिकाण हे गस्ती पथकासाठी महत्वाची आहेत. कारण याच परिसरात बऱ्याचदा चोऱ्या माऱ्या असे गुन्हे झाले आहेत. शहरातील चिकलठाणा, सिडको, मुकुंदवाडी, जवाहरनगर, पुंडलीकनगर,उस्मानपुरा, बेगमपुरा, वेदांतनगर, वाळूज आणि दौलताबाद, हर्सूल याचाही यात समावेश यात आहे.
मोबाईलची कनेक्टिव्हिटी तुटते...
जेव्हा केव्हा मोबाईलची कनेक्टिव्हिटी मिळत नाही, त्यावेळी कोड स्कॅन करण्यास त्रास होतो. परंतु बिटमार्शल, टु मोबाईल मोबाईलवर फोटो व वेळ टाकण्याचा प्रयत्न करतात. परंतु ही बाब नेहमीच होत नाही. योग्य ठिकाणीच तो क्युआर कोड स्कॅन होतो.
शुक्रवारी पहाटे मिळाली शबासकी...
बहुतांश ठाण्यांच्या हद्दीत ७० टक्के आणि १०० टक्के स्कॅनिंग होत असून, गुड जॉब असे संदेश अधिकाऱ्यांकडून त्यांच्या मोबाईलवर झळकत आहेत. चिकलठाणा एमआयडीसी परिसरात गस्तीवर असलेल्या पिटर मोबाईल व बिटमार्शल, २ मोबाईल, बिटमार्शल यांनी गुरूवारी रात्री ११ वाजता गस्त सुरू केली आणि पहाटे ५ वाजेपर्यंत १०० टक्के झाल्यामुळे एमआयडीसी सिडको पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विठ्ठल पोटे यांनी बायस, बोहरा, राऊत, बाळासाहेब डमाळे यांना गुड वर्क म्हणून शाबासकीदेखील दिली.