लातूर : लातूरचा पाणीटंचाईवर वेगवेगळे पर्याय पर्याय शोधणाऱ्या लातुरात सात मित्रांनी एकत्र येऊन पैशाच्या एटीएम मशीनसारखी ‘एटीडब्लू’ मशीन सुरु केली आहे. ज्यात दहा रुपयाचा क्वॉईन घातला की आरो प्लांटमधील २० लिटर शुध्द पाणी जारमध्ये येते. आज कोेल्ड्रींक्सच्या उभ्या आहेत तशा भविष्यात पाण्याच्या एमटीएम मशीनसारख्या मशीन उभ्या राहतील याला हळूहळू बळ येऊ लागले आहे. लातुरातील पाण्याची आबाळ लोकांना अस्वस्थ करतेय. टँकरचे पाणी लोकांना येत असले तरी ते पिण्यायोग्य असण्याच्या शक्यता कुणीही तपासून पहात नाही. बऱ्याच वेळा अशुध्द पाणी टँकरद्वारे पुरवठा होतो. त्यामुळे आरोग्याचे प्रश्न उभे रहात आहेत. श्रीमंत लोक जारचे पाणी २५ ते ४० रुपयाला घेऊन तहान भागवित आहेत. हे सर्व गरिबांना पाणी पिण्याला मिळणे शक्य नाही. यातून वाट काढून किमान पिण्याचे पाणी शुध्द देता यावे यासाठी काही तरुण पुढे आले. नगरसेवक शैलेश स्वामी, नागेश कवडे, प्रा. मितेश स्वामी, मनोज इंगळे, सिध्देश्वर गुणगुणे, राजकुमार वडजे आणि राहूल महाजन यांनी हा उपक्रम सुरू केला आहे.
दहा रुपयाचा क्वाईन घाला ! न्या २० लिटर मिनरल पाणी
By admin | Published: March 11, 2016 12:56 AM