शहरं
Join us  
Trending Stories
1
विक्रमी वर्ष! दक्षिण आफ्रिके विरुद्ध मालिका जिंकत टीम इंडियानं रचला इतिहास
2
"तुम्हाला आत टाकणार"; आदित्य ठाकरेंचा सदा सरवणकरांना भरसभेत इशारा
3
आधी २ 'बदक' आता 'पदक' मिळवणारी सेंच्युरी! संजूनं मोडला KL राहुलचा रेकॉर्ड
4
"शरद पवार फॅक्टर आहेत आणि राहतील, कारण..."; देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान
5
रितिका-रोहित दुसऱ्यांदा झाले आई-बाबा! बेबी बॉयच्या स्वागतासाठी Junior Hit-Man चा ट्रेंड
6
"काळा डाग गुलाबी रंगाने झाकला जात नाही...", अमोल कोल्हेंचा नाव न घेता अजित दादांवर निशाणा
7
संजू सॅमसन अन् तिलक वर्मा दोघांची शतकं; टीम इंडियाच्या जोडीनं रचला खास विक्रम
8
IND vs SA : सर्वोच्च धावसंख्या, सर्वाधिक षटकार अन् दोन शतकवीर; मॅचमधील ५ रेकॉर्ड्स 
9
दिल्लीत पुन्हा ड्रग्सची मोठी खेप जप्त; आंतरराष्ट्रीय बाजारात तब्बल 900 कोटी रुपये किंमत
10
आरे देवा! संजूनं चौकार-षटाकारानं डोळ्याचं पारणं फेडलं, पण तिच्यावर आली रडण्याची वेळ!
11
"लोकं आम्हाला सोडून गेले अन् आता सांगतात की..."; शरद पवारांचा हसन मुश्रीफांवर हल्लाबोल
12
भयानक...! धनत्रयोदशीला नवी कोरी इनोव्हा घेतलेली, अपघातात सहा तरुण मित्रमैत्रिणींचा जीव गेला
13
पॉवर प्लेमध्ये Sanju Samson अन् Abhishek Sharma नं दाखवली 'पॉवर'; पण...
14
मोठी बातमी! राज ठाकरेंनी विश्वास टाकला, उमेदवारी दिली, पण त्यानेच ठाकरे गटात प्रवेश केला
15
लुटणाऱ्याचे पैसे घ्या, पण मनसेला मतदान करा; उल्हासनगरच्या सभेत राज ठाकरेंचे वक्तव्य 
16
IND vs SA 4th T20I : अखेर सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला, मालिका जिंकण्यासाठी सेट करणार टार्गेट
17
"घुसखोरांसह काँग्रेसलाही बांगलादेशात पाठवायला हवे..."; असं का म्हणाले हिमंता बिस्वा सरमा?
18
अजित पवार, अशोक चव्हाणांचा 'बटेंगे तो कटेंगे'ला विरोध; फडणवीस म्हणाले, "त्यांना समजवून..."
19
विजय शिवतारेंच्या पराभवासाठी अनेकजण देव पाण्यात बुडवून बसलेत; एकनाथ शिंदेंची अजितदादांच्या उमेदवाराविरोधात सभा
20
महायुती सत्तेत आली, तर मुख्यमंत्री कोण होणार? एकनाथ शिंदे अन् अजित दादांचं नाव घेत जयंत पाटलांची भविष्यवाणी!

चेकपोस्टवरील पोलिसांच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह

By admin | Published: September 23, 2014 11:08 PM

वसमत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील चेकपोस्ट व पोलिसांच्या ‘सरप्राईज’ चेकींग मोहिमेत आजपर्यंत ३ वेळेस वाहनांत रोख रक्कम सापडली.

वसमत : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर वसमत मतदारसंघातील चेकपोस्ट व पोलिसांच्या ‘सरप्राईज’ चेकींग मोहिमेत आजपर्यंत ३ वेळेस वाहनांत रोख रक्कम सापडली. चेकपोस्टवरील तपासणीत जशी रोख ेरक्कम सापडत आहे तसे दारु, चंदन, रेशनचे धान्य, रॉकेलची आवक, जावक करणारे एखादे वाहन मात्र सापडलेले नाही. यावरुन चेकपोस्टवर फक्त ‘नगदी’वरच लक्ष केंद्रित आहे की काय? असा सवाल उपस्थित होत आहे.वसमत तालुक्यातील जिंतूर फाटा, हट्टा फाटा व साळवा टी पॉईंटवर चेकपोस्ट लावण्यात आले आहेत. वसमत-नांदेड रोडवरील चोंढी फाटा, नागेशवाडी फाटा, हट्टा फाट्यावर १२ महिने पोलिसांचे तपासणी पथक जागता पहारा देते. येथे कर्मचारी फाट्यावरील कर्तव्यासाठीच ओळखले जातात, एवढे ते तरबेज आहेत. तालुक्यात चंदन तस्करी, रॉकेल, स्वस्त धान्यांचा काळा बाजार, अवैध दारूविक्री व गुटख्याचा खुलेआम व्यापार करण्याचे सुरक्षित केंद्र समजले जाते. काळाबाजार करणारे हे वाहनाद्वारे व्यवहार करतात. त्यांना राष्ट्रीय महामार्गावरूनच वाहने न्यावी-आणावी लागतात. स्वस्त धान्य नांदेडमार्ग हैदराबादकडे रवाना होते. खाजगी वाहनांद्वारे नांदेड, हैदराबादकडून गुटखा वसमत येथे येतो. अवैध दारूची ने-आणही या मार्गावरूनच होते. मात्र आजवर जिंतूर टी पॉईंट व अन्य चेक नाक्यांवर एकदाही कशी वाहने सापडली नाहीत, हे विशेष. लोकसभेच्या निवडणुकीवेळी चेकपोस्टवर असे काही हस्तगत झाल्याचे वृत्त नाही. आता विधानसभेच्या निमित्ताने पुन्हा एकदा तपासणी नाके, चेकपोस्टवर आॅन कॅमेरा चेकींग आहे. तालुक्यात आठ दिवसांत तीन वेळेस खाजगी वाहनातून जाणारी रोख रक्कम पकडली गेली. तिन्हीही घटनांत व्यापाऱ्यांचेच पैसे चेकींगमध्ये सापडले. एवढी चोख तपासणी होत असताना वसमतमध्ये ट्रकद्वारे येणारी दारूची धरपकड किवा तपासणी झालेली नाही. दुचाकीवरून राष्ट्रीय महामार्गावरून प्रत्येक गावात जाणारी दारूची खोकेही सापडले नाहीत. वसमतमधून रेशनचे धान्य जिंतूर टी पॉईंटवरून जात असते, तेही सापडले नाही. कुरूंदा भागातून चंदन तस्करांच्या टोळ्या राज्यभरात चंदन पाठवतात. ते चंदनही हाती लागले नाही. रॉकेलचीही धरपकड झाल्याचे ऐकिवात नाही. हवालामार्गे कोट्यवधींचे व्यवहार होतात, असे म्हटले जाते. अशा हवालाची रक्कम घेऊनही जाणारी एखादी लक्झरी बस चेक झाली की नाही, हे समजण्यास मार्ग नाही. कायद्यानुसार नाक्या-नाक्यांवर कडक तपसणी सुरू झाल्याने लहानसहान व्यापार करणारे व्यापारी व खजगी कामांसाठी लाख दोन लाख रूपये घेऊन ये-जा करणारे प्रचंढ धास्तावले आहेत. तसे अवैध व्यवसाय करणाऱ्यांची वाहनेही आॅन कॅमेरा तपासणीत सापडतील व निवडणुकीच्या निमित्ताने का होईना अवैध व्यावसायिकांच्या कारवाया कॅमेराबद्ध होतील, अशी अपेक्षा होती. मात्र आजवर तशी घटना घडलेली नाही. लोकसभा निवडणूक काळात असे निरंक राहिले तशीच स्थिती विधानसभेची राहते की काय, हे पाहणे रंजक ठरणार आहे. यासंदर्भात जिंंतूर टी पॉईंटवरील एसटी पथक प्रमुख गणेश पवार यांच्याशी संपर्क साधून आजवर एखादे दारूचे, चंदनाचे, धान्याचे वाहन सापडले का? असे विचारले असता त्यांनी आजवर तसे काही सपडले नसल्याचे सांगितले. यावरून वसमत तालुक्यात गुटखा येणे बंद झाले. चंदन, धान्य व रॉकेलचीही तस्करी बंद आहे, असे समजावे लागणार आहे. नाहीतर चेकपोस्टवर केवळ नगदीवर लक्ष केंद्रित करून इतर बाबींकडे दुर्लक्ष तरी होत असावे, असेच म्हणावे लागणार आहे. एकंदर चेकपोस्टच्या तपासणीवर प्रश्नचिन्ह आहे. (वार्ताहर)