लाडसावंगी : मागील दोन वर्षांपासून सिंचनासाठी पाण्याची व्यवस्था होत असल्याने, रबी पिके चांगली येत आहेत. मात्र, वातावरणातील बदलामुळे या पिकांवरही कीटकनाशक फवारणीचा खर्च करावा लागत असल्याने अर्थकारण बिघडत असून, शेतकऱ्यांचे कंबर्डे मोडले आहे.
एकीकडे गेल्या दोन वर्षांपासून पाऊस चांगला होत आहे. यामुळे रब्बी पिकाची विक्रमी पेर झाली. यंदा तर रब्बीचा गहू, हरभरा, ज्वारी, मका, सूर्यफूल आदी पिके घेऊन शेतकरी संधीचे सोने करण्याचा आटोकाट प्रयत्न करीत आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे वातावरणात बदल होत असून, यामुळे या पिकांवर अळी व किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होत आहे. यामुळे ही पिके वाचविण्यासाठी शेतकऱ्यांना महागड्या कीटनाशकांची फवारणी करावी लागत आहे. मात्र, तरीही रोग आटोक्यात येत नसल्याने शेतकरी अडचणीत सापडले आहेत. गव्हावर मावाचा प्रादुर्भाव होत असल्याने, परिसरातील अनेक शेतकऱ्यांनी आतापर्यंत दोनदा कीटनाशकांच्या फवारण्या केल्या आहेत.
चौकट
अडचणी वाढल्या
एकीकडे रब्बी पिके म्हणजे खर्च नसलेली पिके समजली जातात. यात थंडी व उन्हामुळे पिकांवर रोग पडत नाही. केवळ पिकाला पाण्याची आवश्यकता असल्याचे आतापर्यंत समज होता. मात्र, या पिकांवर आता किडी व रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. या अगोदरच खरीपाची अतिपावसाने वाट लागलेली असताना, रब्बीचीही पिके धोक्यात आल्यामुळे शेतकऱ्यांंच्या अडचणी वाढल्या आहेत.
फोटो कॅप्शन : १) लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर कीटकनाशक फवारणी करताना शेतकरी. २) लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.
020221\1612260069102_1.jpg~020221\1612260069100_1.jpg
लाडसावंगी परिसरात हरभरा पिकावर किटकनाशक फवारणी करताना शेतकरी.
लाडसावंगी परिसरात मका पिकावर लष्करी अळीने कोवळे पिक असे खाऊन टाकत आहे.