पुरूषोत्तम करवा , माजलगावयेथील तहसील कार्यालयातील बनावट शिक्के व तहसीलदारांच्या बोगस सह्यांच्या आधारे सर्रास एन.ए.चे प्रमाणपत्र तयार करणारे रॅकेट मागील अनेक वर्षांपासून कार्यरत असुन या बनावट एन.ए. च्या आधारे करोडो रूपयांच्या प्लॉट विक्रीतून उलाढाल होवून शासनाचा लाखो रूपयांचा महसूलही बुडविला गेला असुन या गंभीर बाबीकडे महसुल प्रशासनाचे दुर्लक्ष झाले असल्याचे दिसून येत आहे. महसूल प्रशासनाच्या एन.ए. च्या प्रचिलत नियमामध्ये बदल झााल्याने सदरील भूखंडाचा ले आउट झाल्याशिवाय एन.ए. अकृषी परवाना मिळणार नसल्यामुळे ले आउट केल्यास सदरील भुखंडात खुली जागा व मोठे रस्ते करावे लागत असल्यामुळे त्यातील बऱ्याच भुखंडावर पाणी सोडावे लागणार आहे. बनावट एन.ए.च्या आधारे सदरील भूखंड मालकांनी आपल्या भूखंडातील प्लॉटची विक्री केल्याची बाब उघड झाली आहे. या बोगस एन.ए. करणाऱ्या रॅकेटने शहरासह तालुक्यातील अनेक गावातील बोगस एन.ए. केल्याची बाब उघड झाली आहे. या बोगस एन.ए. अकृषी परवान्यांमुळे शासनाचा लाखो रूपयांचा महसूल बुडाला आहे. या प्रकरणी सखोल चैकशी केल्यास या बोगस रॅकेटने केलेल्या अनेक बोगस अकृषी परवान्यांचा पर्दाफाश होवून अनाधिकृत बाबीला आळा बसेल तसेच संबंधितांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल होईल हे मात्र निश्चित. दरम्यान, बनावट एन. ए. ची प्रकरणे समोर येऊ लागल्याने खरेदी विक्री व्यवहारावर परिणाम झाल्याचे दिसून येत आहे.बोगस एन.ए. अकृषी परवानाधारकांची यादी चंदा बजाज, शेख खलील शेख अब्दुल बागवान, शेख तौफिक शेख सत्तार, श्रीकांत राजेंद्र, राजेंद्र सटवाजी मेंडके, तुकाराम किसन सादे, सोनवणे मिराबाई कारभारी व इतर, भागीरथीबाई त्रिंबक फसले व इतर 2, जाधव शिवाजी नारायण, सोळंके यशवंत माणिकराव, शिंदे मिरा बबनराव, वसंत लिंबाजी व इतर , चंद्रशेखर, विनोद, प्रकाश पिता दयाराम जोशी यांचा समावेश आहे.
माजलगावांत बनावट ‘एनए’ चे रॅकेट उघड
By admin | Published: April 25, 2016 11:05 PM