शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
2
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
3
तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
4
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद
5
राज ठाकरेंची शिवाजी पार्कवरील सभा रद्द, पालिकेची परवानगी मिळूनही असा निर्णय का? वाचा कारण
6
तिसरी बार, १०० पार; भाजपाला 'ही' हॅटट्रिक जमेल? नेमकं कसं आहे समीकरण
7
जातनिहाय जनगणनेवर भाजपा आणि नरेंद्र मोंदीनी भूमिका जाहीर करावी, काँग्रेसचं आव्हान
8
"लादीवर झोपवायचे म्हणता, तुमच्या वडिलांना विचारा, तेव्हा...;" रामदास कदम यांची आदित्य ठाकरेंवर जहरी टीका 
9
श्रद्धा वॉकर हत्याकांडातील आरोपी आफताब बिश्नोई टोळीच्या हिटलिस्टवर, तिहार प्रशासन सतर्क
10
भाजपाचा अमित ठाकरेंना पाठिंबा, महायुतीचे समर्थन का नाही? फडणवीसांनी काय घडले, ते सांगितले
11
कॅनडातील पंजाबी गायकांच्या भागात १०० राऊंड फायरिंग; योगायोगाने पोलिसही तिथेच अडकलेले...
12
ज्या व्हॅनने शाळेतून घरी सोडलं तिनेच चिरडलं; वडिलांच्या कुशीतच ६ वर्षीय लेकीने सोडला जीव
13
पुन्हा एकदा महागणार Vodafone-Idea चे रिचार्ज प्लॅन्स? कंपनीच्या अधिकाऱ्यानं सांगितली 'ही' बाब
14
“छत्रपती शिवरायांची मंदिरे बांधण्यापेक्षा गड-किल्ल्यांचे संवर्धन करा”; राज ठाकरे थेट बोलले
15
"...म्हणून सत्तेतील लोकांची पळापळ सुरू झालीये"; जयंत पाटलांचे महायुतीला पाच सवाल
16
शरद पवार- उद्धव ठाकरेंनी मनोज जरांगेशी बोलायला सांगितले..; असीम सरोदेंचा गौप्यस्फोट
17
Kamakhya Temple: पाळीचे ४ दिवस धर्मकार्यासाठी निषिद्ध; कामाख्या मंदिरात त्याच ४ दिवसांचा उत्सव!
18
Raj Thackeray : ‘आम्ही हे करु’! मनसेचा जाहीरनामा आला; राज ठाकरेंनी महाराष्ट्राला काय शब्द दिला? म्हणाले...
19
"अदानींच्या घरी बैठक झाली होती, त्यात…’’, अजित पवार यांच्या दाव्यानंतर शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
20
Tripuri Purnima 2024: त्रिपुरी पौर्णिमेच्या संध्याकाळी त्रिपुरी वात जाळा; महादेवाच्या कृपेने दुःख-दैन्य टाळा!

औरंगाबादमध्ये शिवसेना-भाजपमध्ये राडा; भाजपचे सरचिटणीस केंद्रे यांना शिवसैनिकांची मारहाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 26, 2021 2:51 PM

Shiv sena Vs Bjp : गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

ठळक मुद्देगुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी भाजपचा पोलीस स्थानकात ठीय्यामारहाण केली नसल्याचा शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांचे स्पष्टीकरण

औरंगाबाद : शिवसेनेचे राजेंद्र जंजाळ यांनी भाजप चिटणीस प्रा. गोविंद केंद्रे यांना आज दुपारी गारखेडा येथे मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात मारहाण केल्याचा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. प्रा. केंद्रे यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरु आहेत. गारखेडा येथील कोरोना लसीकरण केंद्रावर झालेल्या वादाचे पर्वसन मारहाणीत झाल्याचे सांगण्यात येत आहे. याबाबत दोन्ही बाजूंनी आरोपप्रत्यारोप करण्यात येत आहेत.  ( BJP general secretary Pro. Kendre beaten by Shiv Sainiks in Aurangabad )  

महापालिका निवडणूका जवळ येत आहेत तसा शिवसेना आणि भाजपमधील संघर्ष आता आणखी तीव्र होत असल्याचे चित्र आहे. गारखेड़ा येथील लसीकरण केंद्रावर भाजपचे सरचिटणीस प्रा. गोविंद केंद्रे आणि शिवसेनेचे माजी उपमहापौर राजेंद्र जंजाळ यांच्यामध्ये बाचाबाची झाली. त्यानंतर राजेंद्र जंजाळ यांनी गोविंद केंद्रे यांना गाडीत घालून शिवसेनेचे मंत्री संदिपान भुमरे यांच्या कार्यालयात नेले. त्या ठिकाणी काही शिवसेनेचे गुंड बोलावून भूमरे यांच्या कार्यालयात मारहाण करण्यात आली. यात प्रा. केंद्रे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. राज्यात मंत्री आणि सत्ताधारी नेत्यांनीच गुंडगिरी करण्याचे प्रकार महाराष्ट्रात वाढत असून औरंगाबादमध्ये ही याची प्रचिती पुन्हा दिसून आली, असा आरोप भाजपकडून करण्यात येत आहे. तर, गारखेडा येथील मंत्री संदीपान भुमरे यांच्या कार्यालयात चहा पिण्यासाठी शिवेसेनेचे राजेंद्र जंजाळ आणि प्रा. गोविंद केंद्रे आणि इतर आले होते. यावेळी प्रा. केंद्रे आणि काही कार्यकर्त्यांमध्ये वाद झाला. यातून एकाने त्यांना खाली पाडले. यानंतर प्रा. केंद्रे यांना जंजाळ यांनी स्वतः उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असे स्पष्टीकरण शिवसेनेने दिले आहे. 

भाजपचे पोलीस स्थानकात ठिय्या दरम्यान, राजेंद्र जंजाळ यांच्यावर अपहरण करून मारहाण करण्यात आल्याचा गुन्हा दाखल करून अटक करावी अशी मागणी करत भाजपकडून जवाहर नगर पोलीस स्थानकात ठिय्या आंदोलन करण्यात येत आहे. 

मी मारहाण केली नाही लसीकरण केंद्रावरून प्रा. केंद्रे व इतर चहा पिण्यासाठी सुतगरिणी चौकात आलो होतो. येथे कार्यकर्ते आणि प्रा. केंद्रे यांच्यात वाद झाला. तेथे प्रा. केंद्रे यांना एकाने मारहाण केली, ते खाली पडले. त्यांना मी सिग्मा हॉस्पिटलमध्ये दाखल केले. मी मारहाण केलेली नाही.- राजेंद्र जंजाळ, शिवसेना 

टॅग्स :Shiv SenaशिवसेनाBJPभाजपाAurangabadऔरंगाबादSandeepan Bhoomraसंदीपान भुमरेCrime Newsगुन्हेगारी