शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणुकीनंतर पवार-शिंदे एकत्र आलेले दिसतील का?; 'लोकमत'च्या मुलाखतीत मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केली भूमिका
2
आजचे राशीभविष्य - १५ नोव्हेंबर २०२४, प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल, नोकरीत वरिष्ठ खुश राहतील
3
निवडणुकीसाठी मध्य रेल्वेच्या विशेष गाड्या; जाणून घ्या वेळापत्रक
4
आजचा अग्रलेख: राज यांची टाळी, योग्य वेळी!
5
Ola Electric विरोधातील तक्रारींच्या तपासाचे आदेश, कंपनीपुढील समस्या वाढणार का?
6
विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी; निवडणुकीमुळे शाळांना तीन दिवस सुट्टी?
7
पूर्व नागपुरात महायुती-महाविकास आघाडीसमोर बंडखोरांचे आव्हान
8
कार्यकर्ते लागले कामाला, मतदानासाठी बस निघाल्या गावाला!
9
सिमकार्ड कंपनीच्या कर्मचाऱ्यांनीच मारला ३० हजार लोकांच्या डेटावर डल्ला; भारतातील अनेकांची कोट्यवधींची फसवणूक!
10
कुलाब्यात ४ हजार पोलिसांचे टपाली मतदान; उद्यापर्यंत बजावता येणार हक्क!
11
तामिळनाडूच्या तिरची गँगच्या आरोपीला अटक; वाहनांची काच फोडून करायचा चोरी, ६ गुन्ह्यांची उकल
12
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
13
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
14
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
15
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
16
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
17
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
18
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
19
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
20
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'

राधास्वामी कॉलनी समस्यांच्या गर्तेत;गैरसोयीमुळे विद्यार्थी व वृद्धांसह सर्वच त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 22, 2019 6:35 PM

सुविधा पुरविण्यासाठी मनपाचे दुर्लक्ष  

ठळक मुद्देबाराही महिने टँकरवर अवलंबून कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच मनपाचे कर्मचारी दररोज कचरा जाळतात

- साहेबराव हिवराळे औरंगाबाद : जटवाडा रोडवर १५ वर्षांपूर्वी वसलेल्या राधास्वामी कॉलनीचे नागरिक महापालिकेचे सर्व कर भरतात; परंतु मनपाने अद्यापही ना अंर्तगत रस्ते केले ना जलवाहिनी टाकली. त्यामुळे १२ महिने टँकरच्या पाण्यावर तहान भागविणाऱ्या नागरिकांना पावसाळ्यात गुडघाभर पाणी व चिखल तुडवत घर गाठावे लागते. मुख्य रस्ता वगळता अंतर्गत रस्त्यावर निव्वळ दलदलपुरी झाली आहे. त्यातच कॉलनीच्या प्रवेशद्वारावरच मनपाचे कर्मचारी दररोज कचरा जाळून प्रदूषण वाढवितात.

राधास्वामी कॉलनी, गायकवाड सोसायटीतील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधांसाठी सतत संघर्ष करावा लागत आहे. राधास्वामी कॉलनीतील सत्संग भवनामागे सांडपाण्याचे डबके बाराही महिने तुंबलेले असते. पाण्याची दुर्गंधी सहन करीतच ये-जा करावी लागते. मनपाच्या आरोग्य विभागाने या परिसरात औषधाची फवारणी करणे गरजेचे आहे. सांडपाण्यामुळे डासांचा त्रास वाढला असून, आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. इतर परिसरात जलवाहिनी टाकलेली आहे; परंतु राधास्वामी कॉलनीत टँकर किंवा जारच्या पाण्याशिवाय पर्यायच नाही. आटलेल्या बोअरवेला सध्या पावसामुळे पाणी आले असले तरी ते उन्हाळ्यापर्यंत टिकत नाही. 

...अन्यथा आंदोलन कॉलनीतील रस्ते, पाणी, औषध फवारणी, तसेच आरोग्यसेवेचा प्रश्न गंभीर बनला आहे. गाºहाणी मांडूनही सेवा-सुविधा देण्याकडे दुर्लक्ष केले जात आहे. लवकरच मनपा कार्यालयावर मोर्चा काढून आंदोलन छेडण्याचा इशारा सुनीता तारगे, सरिता शिंदे, सलिमाबी शेख, शेख अब्दुल रहेमान, दीपाली इखणकर, रेखा बाविस्कर, भारती गायकवाड, आदित्य सदाशिवे, विशाल आधाने, प्रदीप नलावडे, शुभम गायकवाड आदींनी दिला आहे.

नागरिकांच्या मते...कचऱ्याला लावतात आगमहानगरपालिकेने सफाई अभियान राबविले. कचरागाड्या गल्लीबोळांत फिरवून जमा केलेला कचरा कॉलनीच्या प्रथमदर्शनी तोंडावर आणून जाळला जातो. त्यामुळे प्रदूषण वाढून नागरिकांचे आरोग्य बिघडत आहे. -गणेश दौड 

घाण पाण्यातून वाटमोर्चा काढून व गाºहाणी मांडून नागरिक थकले आहेत; परंतु रस्त्यावर तुंबलेल्या डबक्याचा बंदोबस्त झाला नाही. नाइलाजास्तव घाण पाण्यातून वाट काढीत जावे लागते. वयोवृद्ध येथे अनेकदा घसरून पडून जखमी झाले आहेत. -सुनीता बाविस्कर 

खाजगी ड्रेनेज लाईन परिसरात अनेकांनी खाजगी मलनिस्सारण वाहिनी टाकलेली असून, ती सतत तुंबते. तिच्या दुरुस्तीसाठी मनपाचे कर्मचारी वेळेवर येत नाहीत. नवीन गल्लीत मनपाने मलनिस्सारण वाहिनी टाकून सांडपाण्याची विल्हेवाट लावावी.  - रमेश तारगे 

नळाने पाणीपुरवठा कराशहरात ज्याप्रमाणे जलवाहिनीद्वारे पाणीपुरवठा केला जातो त्याचप्रमाणे विविध गल्ल्यांत पाणी-पुरवठ्यासाठी  जलवाहिनी टाकावी. कर अदा केले असताना टँकरसाठीचा मोठा भुर्दंड दर महिन्याला सहन करावा लागत आहे. - सागरबाई दांडगे 

स्वखर्चाने टाकतात मुरूम-माती वॉर्डातील मुख्य रस्ता सिमेंट काँक्रीटचा असला तरी राधास्वामी कॉलनी व गायकवाड सोसायटीत घुसण्यासाठी चिखलच तुडवावा लागतो. स्वखर्चाने मुरूम-माती टाकून रस्ते बनवावे लागतात. अतिक्रमण वाढल्याने घरापर्यंत वाहन आणणे किंवा शाळकरी विद्यार्थी वाहतूक करणाऱ्यांना त्रासदायक ठरत आहे.  - शेख जावेद शेख रफिक

टॅग्स :Aurangabad Municipal Corporationऔरंगाबाद महानगरपालिकाWaterपाणीAurangabadऔरंगाबाद