औरंगाबाद: निरालाबाजार येथील फ्लो कॅफे अॅण्ड लाँजवर गुरूवारी रात्री गुन्हेशाखेने धाड टाकून तंबाखू मिश्रीत हुक्का ओढत बसलेल्या १४ तरूणांना ताब्यात घेतले. या तरूणांना समज देऊन सोडून देण्यात आले. तर कॅफेचा व्यवस्थापक आणि मालकाविरोधात कारवाई करण्यात आल्याची माहिती गुन्हेशाखेने दिली.
कॅफेचा मालक शेख समीर शेख सलीम(२४,रा. रंगीन दरवाजा परिसर),व्यवस्थापक फराज अहमद सिद्दीकी(२१,रा.टाईम्स कॉलनी)अशी गुन्हा नोंद झालेल्या आरोपींची नावे आहेत. निरालाबाजार येथील आर्टस अॅण्ड एक्झीकेटीव हॉटेलच्या चौथ्या मजल्यावर फ्लो कॅफे अॅण्ड लाँज नावाचा हुक्का पार्लर सुरू आहे. तेथे ग्राहकांना हानीकारक असता तंबाखूमिश्रीत हुक्का पिण्यास दिला जातो,अशी माहिती खबऱ्याने गुन्हेशाखेला गुरूवारी दिली. माहिती मिळताच सहायक आयुक्त डॉ. नागनाथ कोडे, गुन्हेशाखेचे निरीक्षक मधूकर सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक अजबसिंग जारवाल, फौजदार विजय जाधव, कर्मचारी पठाण, राजेंद्र साळुंके, क्षीरसागर आणि कर्मचाऱ्यांनी दोन पंचासमक्ष गुरूवारी रात्री अडिच वाजेच्या सुमारास कॅफेवर धाड टाकली. तेव्हा तेथे एका अल्पवयीन मुलासह १४ तरूण सोफ्यावर बसून हुक्का पित असल्याचे आढळले. तेथे तंबाखूमिश्रीत हुक्क ा, हुक्का ओढण्याची चार भांडी, पाईप,तसेच शरिरास घातक अशा दोन वेगवेगळी तंबाखूची डबे, वेगवेगळ्या फ्लेवरची तंबाखूची ४० लहान पाकिटे जप्त करण्यात आली. ही कारवाई रात्री अडिच ते पहाटे पाच वाजेपर्यंत चालली. यानंतर सर्व तरूणांना आणि कॅफे व्यवस्थापकाला गुन्हेशाखेत नेण्यात आले.
समज देऊन सोडले तरूणांनाकॅफेमध्ये हुक्का ओढताना पकडण्यात आलेल्या तरूणांना ताब्यात घेऊन गुन्हेशाखेत नेल्यानंतर त्यांना समज देण्यात आली. त्यांच्या आईवडिलांना याबाबत माहिती देण्यातत आल्याची माहिती सुत्रांनी दिली.