लोकमत न्यूज नेटवर्कलातूर : मुंबई-लातूर एक्स्प्रेस रेल्वे ही लातूरकरांची ओळख असून हा प्रश्न लातूरकरांच्या अस्मितेचा आहे़ रेल्वे बचाव कृती समितीने सुरू केलेले आंदोलन हे कुठल्या शहराच्या विरोधात नाही़ लातूरकरांच्या हक्कासाठी ही लढाई आहे़ मुंबई-लातूर रेल्वे विस्तारीकरणाच्या विरोधात ९ मे रोजी रेल रोको आंदोलन करण्यात येणार आहे़ या आंदोलनात सर्वच लोकप्रतिनिधी, कार्यकर्ते आणि लातूरकर सहभागी होणार असल्याचे माहिती रेल्वे बचाव कृती समितीच्या बैठकीत शनिवारी देण्यात आली़ आंदोलनात आ. अमित देशमुख, आ. त्र्यंबक भिसे, आ. बसवराज पाटील आणि आ. विक्रम काळे सहभागी होणार आहेत. पालकमंत्री संभाजीराव पाटील-निलंगेकर यांनीही या आंदोलनात सहभागी व्हावे, यासाठी कृती समिती विनंती करणार आहे. (अधिक वृत्त हॅलो/ २वर)
रेल्वेच्या बीदर विस्ताराविरोधात ९ मे चा रेल रोको ऐतिहासिक करणार
By admin | Published: May 07, 2017 12:06 AM