औरंगाबाद : सतत उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाºया प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला.दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातून नियमित प्रवास करणारे मासिक पासधारक प्रवाशांना उशिरा धावणाºया रेल्वेंमुळे मनस्ताप होत आहे. कधी मेगा ब्लॉक, कधी इंजिनिअरिंग ब्लॉक तर कधी इंजिन नादुरुस्तीमुळे रेल्वेला उशीर होत आहे. त्यामुळे गैरसोय टाळण्यासाठी जालना-मनमाड-जालना, जालना-परभणी-जालना, परभणी-मुदखेड-परभणी, परभणी-परळी-लातूर-परळी-परभणी नवीन डेमू शटल सुरूकरण्यात यावी, मेगा ब्लॉक केवळ रविवार अथवा सुटीच्या दिवशी घेण्यात यावा,अशी मागणी प्रवाशांनी केली.या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी प्रवाशांनी सोमवारी डोक्याला काळ्या फिती बांधून प्रवास केला. काहींनी काळ्या टोप्या, मफलर परिधान केले होते. यामध्ये विद्यार्थिनींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. प्रवाशांनी औरंगाबाद रेल्वेस्टेशनवर जोरदार घोषणा दिल्या. यावेळी रेल्वे प्रवासी सेनाध्यक्ष संतोषकुमार सोमाणी , रामेश्वर बिलवने पाटील,अंबादास माडवगड, दादासाहेब घोडके, गोरख गिरी, मनीष मुथा, अरुण भाग्यवान, कृष्णा सरोवर यांच्यासह महिला, विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.या रेल्वे धावतात उशिराधर्माबाद-मनमाड हायकोर्ट एक्स्प्रेस, निजामाबाद-पुणे-निजामाबाद पॅसेंजर, काचीगुडा-मनमाड पॅसेंजर, हैदराबाद-औरंगाबाद-हैदराबाद पॅसेंजर, निजामाबाद-पंढरपूर-निजामाबाद या पाचही रेल्वे गेल्या एक वर्षापासून एक ते नऊ तासांपर्यंत उशिराने धावत आहे. कधी-कधी तर रेल्वे रद्दच करण्यात येते,असे रेल्वे प्रवासी संघटनेचे म्हणणे आहे.
काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2019 10:49 PM
सतत उशिरा धावणाऱ्या रेल्वेगाड्यांमुळे विद्यार्थ्यांसह नोकरी व्यवसायानिमित्त दररोज ये-जा करणाºया प्रवाशांना अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. वेळापत्रक पाळले जात नसल्याने प्रवाशांनी रेल्वे प्रशासनाच्या निषेधार्थ सोमवारी काळ्या फिती बांधून रेल्वे प्रवास केला.
ठळक मुद्देप्रवाशांचे आंदोलन : वर्षभरापासून पाच रेल्वे धावतात सतत उशिराने