शहरं
Join us  
Trending Stories
1
Pahalgam Attack Update: दहशतवाद्यांनी हत्या केलेल्यांची नावे समोर, मृतांमध्ये महाराष्ट्रातील ६ जण, जखमी कोण?
2
"पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी धर्म विचारला असेल तर त्याला भाजपाचं द्वेषाचं राजकारण जबाबदार’’, संजय राऊतांचा आरोप
3
पहलगाम दहशतवादी हल्लाः "माझ्या डोळ्यासमोरच वडिलांवर गोळ्या झाडल्या"; पुण्यातील जगदाळे, गनबोटे कुटुंब
4
व्हीआय आणि बीएसएनएल विलीन होणार? दूरसंचार मंत्री ज्योतिरादित्य सिंधियांनी केलं स्पष्ट
5
गावचा कचरा साफ करून मुलीला शिकवलं; चार ओळीची चिठ्ठी लिहून तिने आयुष्य संपवलं
6
पाकिस्तानच्या उलट्या बोंबा... म्हणे, हल्ल्यामागे भारतातील लोकांचाच हात, आम्ही दहशतवादाच्या विरोधात!
7
पहलगाम हल्ल्यानंतर कोकण किनारपट्टीवर अलर्ट! पोलिसांनी गस्त वाढवली; संशयित हालचालीवर लक्ष ठेवण्याचे आदेश
8
₹९,३७,०२,९०,८९,७०० चं कर्ज आणि जग जिंकण्याचं स्वप्न.., काय आहे वेदांताच्या अनिल अग्रवालांचा प्लान?
9
...ती पैशानंही 'गब्बर' झाली होती; टोकाचा निर्णय घेण्यापूर्वी डॉक्टरांचे शेवटचे ३ कॉल
10
पहलगाममधील हल्ल्यानंतर बारामुल्ला येथे तुंबळ चकमक, लष्कराकडून दोन दहशतवाद्यांना कंठस्नान 
11
₹८९४ कोटींचा व्यवसाय, तरी का विकली गेली 'बिर्याणी बाय किलो'; कोण आहे नवा मालक, कितीत झाली डील?
12
Pahalgam Attack: हातात रायफल, डोक्यावर टोपी; दहशतवाद्याचा पहिला फोटो आला समोर
13
टॅक्स भरण्यासाठी आता सीएकडे जाण्याची गरज नाही; सरकारच्या ई-पे टॅक्स पोर्टलवरुन होईल काम
14
दहशतवाद्यांच्या हल्ल्यानंतर राहुल गांधींचा अमित शाह यांना फोन; काय चर्चा झाली?
15
सौदीतून परतलेल्या मोदींना डोभाल आणि जयशंकर यांनी विमानतळावरच दिली पहलगाम हल्ल्याबाबत माहिती, मोठा निर्णय होणार?   
16
पतीसोबत काश्मीरमध्ये फिरायला गेली होती टीव्ही अभिनेत्री, दहशतवादी हल्ला झाल्यानंतर म्हणाली- "आम्ही आजच सकाळी..."
17
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर उरीमध्ये घुसखोरीचा प्रयत्न उधळला; लष्कर आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरूच
18
पत्नीच्या मदतीनं करू शकता ₹४४,७९३ च्या मंथली पेन्शनचा जुगाड; एका झटक्यात मिळतील ₹१,११,९८,४७१
19
पहलगाम हल्ल्यावरून राज ठाकरे संतप्त, केंद्राला म्हणाले, "दहशतवाद्यांच्या पुढच्या १० पिढ्यांचा थरकाप उडेल असा...’’,   
20
Pahalgam Terror Attack: गोळ्या झाडल्या जात होत्या, मागे राहिलेले मारले जात होते... धावत होते

ट्रकच्या धडकेनंतर रेल्वे गेटचे खांब अडकले विजेच्या लाइनला; अनेक रेल्वे खोळंबल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 11, 2025 16:34 IST

रेल्वेसाठी लासूर रेल्वे गेट बंद होत असताना तेथून पुढे निघण्याच्या घाईने मक्याने भरलेला ट्रक फाटकाला धडकला.

छत्रपती संभाजीनगर/लासूर स्टेशन : लासूर स्टेशन येथे ट्रकच्या धडकेने रेल्वे फाटकाचे खांब थेट रेल्वेच्या ओव्हरहेड लाइनमध्ये अडकल्याची घटना सोमवारी (दि. १०) दुपारी २.५० वाजता घडली. यामुळे मनमाड ते नांदेड मार्गावरील जवळपास ७ रेल्वेंचे वेळापत्रक विस्कळीत झाले. परिणामी, प्रवाशांना प्रचंड गैरसोयीला सामोरे जावे लागले.

रेल्वेसाठी लासूर रेल्वे गेट बंद होत असताना तेथून पुढे निघण्याच्या घाईने मक्याने भरलेला ट्रक फाटकाला धडकला. रेल्वे फाटकाचे खांब थेट रेल्वेच्या ओव्हरहेड केबलला (२५ हजार केव्ही) अडकले. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन जवळपास ३ तास छत्रपती संभाजीनगर - मनमाड रेल्वेमार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली. लासूर स्टेशन येथील रेल्वे फाटक ७ तास बंद होते. यामुळे वाहनचालकांना पर्यायी मार्गाने ये-जा करावी लागली तर चारचाकी वाहनांना कांदा मार्केटजवळील अंडरपास पुलाने प्रवास करावा लागला.

रेल्वे आरसीएफचे परमवीरसिंग व निंबाळकरसह पोलिसांनी ट्रकवर (क्र. एमएच ०५ एएम ९०९०) कारवाई केली आहे. रेल्वे गेटच्या शॉर्टसर्किटमुळे चारही लोकेशन बॉक्समधील वायरिंग फ्युज जळाले. रेल्वे गेट ऑपरेट करणाऱ्या बॉक्समध्येदेखील वायरिंग जळून बिघाड झाला. रात्री १० वाजेपर्यंत दुरुस्तीचे काम सुरू होते.

सुदैवाने दुर्घटना टळलीयात सुदैवाने मोठी जीवितहानी टळली. ओव्हरहेड केबलला रेल्वे गेटचा पाइप ट्रकसह अडकला. ट्रकमध्ये मका पोते असल्याने त्या पोत्यावर तो पाइप असल्याने मोठी जीवितहानीदेखील टाळली. घटनेनंतर ट्रकचालक फरार झाला, अशी माहिती रेल्वे सेनेचे अध्यक्ष संतोषकुमार सोमाणी यांनी दिली.

रेस्क्यू टीम घटनास्थळीघटनेनंतर तासाभरात रेस्क्यू टीमने घटनास्थळी धाव घेऊन रेल्वे गेटचा पाइप बाजूला करून तात्पुरती तारेची बायडिंग करून रेल्वे वाहतूक सुरळीत केली.

या रेल्वेंवर परिणामया दुर्घटनेमुळे तपोवन एक्स्प्रेस अडीच तास, मराठवाडा एक्स्प्रेस एक तास, जनशताब्दी ४५ मिनिट, वंदे भारत एक्स्प्रेस ४० मिनिट उशिराने धावली. नांदेड - पुणे, काचिगुडा - नागरसोल, शिर्डी - काकीनाडा या रेल्वेही उशिराने धावल्या.

टॅग्स :chhatrapati sambhaji nagarछत्रपती संभाजीनगरCrime Newsगुन्हेगारीrailwayरेल्वे