औरंगाबाद : दक्षिण मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक अरुणकुमार जैन हे आज औरंगाबादरेल्वेस्टेशनवर दुपारी १२. ३० वाजेच्या सुमारास दाखल झाले. अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या फौजफाट्यासह पाहणी सुरू असून, या पाहणी दौऱ्यातून औरंगाबादला काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. दक्षिण मध्य रेल्वेच महाव्यवस्थापक अरूण कुमार जैन हे शुक्रवारी (दि.९) सकाळी ९ वाजता मनमाडहून औरंगाबादकडे रवाना झाले. येताना नगरसोल, अंकाई तसेच इतर ठिकाणच्या विद्युतीकरणासह इतर कामाची पाहणी केली. त्यानंतर ते दुपारी १२.३० वाजेच्या सुमारास औरंगाबाद रेल्वेस्थानकावर दाखल झाले. येथे रेल्वेस्टेशनसह, रेल्वे रुळ, विद्युतीकरणाचे काम, रेल्वे कर्मचाऱ्यांच्या निवास्थानासह इतर कामांचे निरीक्षण करीत आहेत.
यावेळी रेल्वेस्थानक व्यवस्थापक एल. के. जाखडे यांच्यासह अधिकारी उपस्थित आहेत. महाव्यवस्थाकांच्या दौऱ्याची तयारी करण्यासाठी ३० नोव्हेंबर रोजी नांदेड विभागाचे व्यवस्थापक उपिंदर सिंग यांनी मनमाड ते औरंगाबाद दौराकरून कामाची पाहणी करत अधिकाऱ्यांना योग्य त्या सूचना दिल्या होत्या. तेव्हांपासूनच येथील अधिकारी दौऱ्याच्या कामाला लागले होते.