शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय बैठक संपली, बाहेर येताच राहुल गांधीची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले, “सरकारने आता...”
2
"इन आतंकी कुत्तों को..."; पत्रकार परिषदेदरम्यान ओवेसींना अमित शाह यांचा फोन! काय झालं बोलणं?
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर दोन दिवसांत महाराष्ट्रातील ५०० पर्यटक राज्यात परतले!
4
VIDEO: ना हात मिळवले, ना गेट उघडले; पहलगाम हल्ल्यानंतर अटारी-वाघा बॉर्डरवर बदलली रिट्रीट सेरेमनी
5
"लोकांच्या टॅक्समधून विमानसेवा; तुम्ही घरून पैसे भरले नाहीत"; नरेश म्हस्केंवर रोहिणी खडसेंची टीका
6
श्रीनगर येथे DCM एकनाथ शिंदे सक्रीय, १८४ जणांना सुखरूप पाठवले; जखमींची केली विचारपूस
7
आता ना LOC, ना...! काय आहे शिमला करार, जो रद्द करण्याची धमकी देतोय पाकिस्तान? भारताच्या पथ्थ्यावर?
8
मस्तच! कडू लागणाऱ्या 'डार्क चॉकलेट'चे गोड आरोग्यदायी फायदे; वजन कमी करायचं असेल तर...
9
पहलगाम हल्ला: दिल्लीत सर्वपक्षीय बैठक, ठाकरे गटाचे नेते गैरहजर; पत्र पाठवले अन् म्हणाले...
10
"Today I Say to the Whole World..."; बिहारच्या भाषणात PM मोदी इंग्रजी का बोलले? यामागे आहे खास कारण
11
“अचानक गोळीबार झाला, २ लहान मुले सोबत होती अन्....”; देवदूत ठरला गाइड, ११ जणांचे जीव वाचवले
12
चुकून सीमा ओलांडून पाकिस्तानात पोहोचला बीएसएफ जवान; पाकिस्तानी रेंजर्सनी घेतले ताब्यात
13
“आता कलमा वाचायला शिकतोय, कधी कामी येईल माहिती नाही”: भाजपा खासदार निशिकांत दुबे
14
"अख्खं हॉटेल रिकामं, सकाळी ६ वाजता रुमचं दार वाजलं अन्...", कल्याणमधील जोडप्याचा जम्मू-काश्मीरमधील भयावह अनुभव
15
Akshaya Tritiya 2025: सोन्याचे वाढते भाव पाहता अक्षय्य तृतीयेला सुवर्णदान शक्य नाही? करा 'या' पाच वस्तूंचे दान!
16
न्यूजरूममध्ये डिबेटदरम्यान भूकंपाचे धक्के, तरीही टीव्ही अँकरनं काम सुरूच ठेवलं, आता होतेय चर्चा!
17
समस्या संपत नाही, अडचणी थांबत नाही? मनापासून ‘या’ गोष्टी सुरू करा, स्वामी नक्की कृपा करतील!
18
Video - संतापजनक! मोबाईल घेतल्याने विद्यार्थिनीला आला राग, शिक्षिकेला केली चपलेने मारहाण
19
पाकिस्तानचा तीळपापड! भारतासोबत व्यापार नाही, हवाई क्षेत्रही केलं बंद; म्हणे, पाणी रोखणे युद्धाची घोषणाच...
20
दिल्लीत हालचालींना वेग; गृहमंत्री अमित शाहा अन् एस परराष्ट्रमंत्री जयशंकर राष्ट्रपतींच्या भेटीला...

औरंगाबादमधील ‘पिटलाईन’च्या उत्तरासाठी रेल्वेला दोन आठवडे मुदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2018 15:37 IST

या जनहित याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. 

औरंगाबाद : औरंगाबाद विभागातून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी ‘पिटलाईन’ची (रेल्वेच्या देखभाल आणि दुरुस्तीसाठीचा ट्रॅक) मंजुरी मिळण्याकरिता दाखल याचिकेच्या अनुषंगाने उत्तर दाखल करण्यासाठी दोन आठवड्यांचा वेळ देण्याची विनंती रेल्वे प्रशासनाच्या वतीने अ‍ॅड. मनीष नावंदर यांनी शुक्रवारी (दि.१९ आॅक्टोबर) केली. त्यावरून औरंगाबाद खंडपीठाचे न्या. प्रसन्ना बी. वराळे आणि न्या. मनीष पितळे यांनी त्यांची विनंती मंजूर केली. या जनहित याचिकेची पुढील सुनावणी दिवाळीच्या सुटीनंतर होण्याची शक्यता आहे. 

येथील विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीने अनेक बैठकांमध्ये औरंगाबाद विभागातून नवीन रेल्वे सुरू करण्यासाठी औरंगाबाद, नगरसोल, चिकलठाणा आणि करमाड या चारपैकी एका रेल्वेस्थानकालगत ‘पिटलाईन’ मंजूर करण्याचा प्रस्ताव रेल्वे बोर्डाला दिला होता. त्याचप्रमाणे रेल्वे प्रवासी संघटना, मराठवाडा रेल्वेविकास समिती, मराठवाडा रेल्वे प्रवासी सेना आदी संघटनांनीही वरीलप्रमाणे प्रस्ताव रेल्वे बोर्डाला पाठविले होते.

त्यावरून नांदेड येथील विभागीय रेल्वे व्यवस्थापकांनी तज्ज्ञांची समिती नेमून वरील स्थळांची पाहणी करून आर्थिक आणि वास्तव अहवाल तयार करून चिकलठाणा येथे ‘पिटलाईन’ प्रस्तावित केली होती. रेल्वेच्या सक्षम अधिकाऱ्यांनी तयार केलेला प्रस्ताव २८ सप्टेंबर २०१७ ला रेल्वे बोर्डाकडे पाठविला होता; परंतु रेल्वेमंत्र्यांनी अशी पिटलाईन टाकणे व्यवहार्य नसल्याचे स्थानिक खासदारांना कळविले होते. पुढे तो प्रस्ताव गुंडाळला गेला.म्हणून विभागीय रेल्वे उपभोक्ता सल्लागार समितीचे माजी सदस्य मंगेश कपोते यांनी अ‍ॅड. अजित कडेठाणकर यांच्यामार्फत खंडपीठात याचिका दाखल केली आहे.

औरंगाबाद विभागातून अधिकच्या रेल्वे सुरू झाल्यास रेल्वेचा महसूल वाढेल, येथील दिल्ली, मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर (डीएमआयसी), वाढते औद्योगिक क्षेत्र, राज्याची पर्यटन राजधानी, शेंद्रा पंचतारांकित औद्योगिक क्षेत्र, उच्च न्यायालय आदींचा विचार करता औरंगाबाद विभागातून अधिकच्या रेल्वे सुरू होणे आवश्यक आहे. त्यासाठी ‘पिटलाईन’ची मंजुरी मिळणे आवश्यक आहे. औरंगाबादची गरज पाहता मुंबईसाठी मनमाडला १२ तास उभ्या असणाऱ्या पंचवटी आणि राज्य राणी एक्स्प्रेस औरंगाबादपर्यंत आणल्यास औरंगाबादहून मुंबईसाठी दोन अतिरिक्त  रेल्वे मिळतील.

देशातील इतर भागांत जाण्यासाठी नांदेड येथून २४ ची मान्यता असताना १८ बोगींसह धावणाऱ्या श्रीगंगानगर, पटणा, संत्रागच्छी या रेल्वे औरंगाबादपर्यंत वाढविता येऊ शकतात. रेल्वे मंत्रालयाने कुठलेही संयुक्तिक कारण न देता २०१७ साली फेटाळलेल्या पिटलाईनच्या प्रस्तावाचा सकारात्मक फेरविचार करून चिकलठाणा येथे पिटलाईनला मंजुरी द्यावी, अशी विनंती याचिकाकर्त्याने केली आहे.

टॅग्स :Aurangabadऔरंगाबादrailwayरेल्वेAurangabad Railway Stationऔरंगाबाद रेल्वे स्टेशनAurangabad High Courtऔरंगाबाद खंडपीठCentral Governmentकेंद्र सरकार