शहरं
Join us  
Trending Stories
1
विधानसभेला बारामतीतून कोणी तिकीटच मागितले नाही; युगेंद्र पवारांना उमेदवारी का दिली, सुप्रिया सुळेंनी सांगितले
2
सुनिल केदारांनी महाविकास आघाडीचा विश्वासघात केला; ठाकरेंच्या भास्कर जाधवांची टीका
3
टी-२० मालिका : युवा भारतीयांची ‘कसोटी’, दक्षिण आफ्रिकेविरुद्ध छाप पाडण्याची संधी
4
चॅम्पियन्स ट्रॉफी : पाकिस्तान हायब्रिड मॉडेलसाठी तयार, भारताचे सामने यूएईमध्ये रंगण्याची शक्यता
5
डब्ल्यूपीएल : हरमन, स्मृती, जेमिमा रिटेन
6
मला तो पक्ष नको, चिन्ह नको अजित पवारांना लखलाभो; सुप्रिया सुळेंनी बंडापूर्वी काय घडले ते सांगितले...
7
ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या कारवर हल्ला; नांदेडच्या कंधार तालुक्यातील घटना
8
जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांचा गावातील रक्षण समितीच्या सदस्यांवर हल्ला; दोघांची हत्या
9
नादाला लागू नका, यापुढे मराठा आरक्षणावर बोलू नका; मनोज जरांगे यांचा राज ठाकरेंना इशारा
10
"एकदा संधी द्या, नालायक ठरलो तर पुन्हा तोंड दाखवणार नाही", राज ठाकरेंचे भावनिक आवाहन...
11
काँग्रेस पक्ष संकटात असताना अशोक चव्हाण अटकेच्या भीतीने भाजपात गेले; नाना पटोलेंचा निशाणा
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मविआच्या जाहिरातीमधून अजित पवारांची बदनामी; राष्ट्रवादीने दिली पोलीस आयुक्तांकडे तक्रार
13
पाकिस्तानी सैन्य प्रमुखांचा पाकिस्तानातच अपमान; इराणी गार्डनी रोखले, बैठकीलाच जाऊ देईनात
14
IPL 2025: KKRने केली मोठी चूक? रिलीज केलेल्या 'या' २ खेळाडूंनी केला 'सुपरहिट धमाका'
15
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
16
WPL 2025 Retention: स्मृती ते हरनमप्रीत! इथं पाहा ५ संघातील रिटेन-रिलीज खेळाडूंची संपूर्ण यादी
17
"राजसाहेब तुम्हाला खरंच बडव्यांनी घेरलंय, सावध रहा"; ठाकरे गटात गेलेल्या अखिल चित्रेंचा इशारा
18
मुंबईत एकनाथ शिंदे - उद्धव ठाकरेंमध्ये कोण वरचढ?; 'या' ११ जागा ठरणार निर्णायक
19
AUS vs IND : 'ते' विसरा त्यांनी १५ वर्षांत स्वत:ला सिद्ध केलंय; कपिल देव यांची विराट-रोहितसाठी बॅटिंग
20
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?

धोऽऽ धो बरसला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 09, 2017 1:01 AM

शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली

लोकमत न्यूज नेटवर्कऔरंगाबाद : शहर व परिसरात शुक्रवारी पहाटे आणि सायंकाळी पावसाने जोरदार हजेरी लावली. सायंकाळी झालेल्या पावसाने रस्त्यांना तळ्याचे स्वरूप आले. त्यामुळे अनेक वाहने पाण्यात गेली.पूर्वा नक्षत्रात पडलेल्या पावसाने शहर व परिसर झोडपून काढला असून, सकाळी २२.४ मि.मी. पावसाची नोंद झाली. दुपारी कडक ऊन पडल्यानंतर आकाशात ढगांची गर्दी झाली होती आणि सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास धो धो पाऊस बरसला. यामुळे सायंकाळी जनजीवनावर परिणाम झाला. अनेक रस्त्यांवर वाहतूक खोळंबलेली दिसली. या पावसाची ५ मि.मी. नोंद झाली आहे. जोरदार पावसामुळे सखल भागात पाण्याचे तळे निर्माण झाले होते.गुलमंडी, समर्थनगर, औरंगपुरा, समतानगर, क्रांतीचौक, कॅनॉट प्लेस, हडको, सेंट्रलनाका, बीड बायपास, जालना रोड आदी ठिकाणी रस्त्यांवरून पुराचे पाणी वाहत असल्यासारखे चित्र होते. शहरातील विविध रस्त्यांच्या बाजूला असलेल्या गटारीच गायब झाल्याने पावसाच्या पाण्याचा निचरा न होता. ते पाणी रस्त्यावरून वाहत होते. पावसाच्या पाण्यामुळे अनेक ठिकाणी खड्डे पडले आहेत. त्यातच अनेक रस्त्यांवर दिवे नसल्याने वाहनचालकांना रस्त्यावरील खड्ड्यांचा अंदाज येत नव्हता. त्यामुळे वाहतूक मंद झालेली दिसली. अनेक वाहनेदेखील खड्ड्यात आदळून किरकोळ अपघाताचे प्रकार घडले.सकाळी झालेल्या पावसामुळे विद्यार्थी, अधिकारी, कर्मचाºयांची गैरसोय झाली. पुन्हा सायंकाळीही पावसातच घर गाठावे लागले. नुकतेच मुरूम, खडी टाकून मनपाने बुजविलेले खड्डे धो धो पावसाने धुऊन गेले.