बीड : खरीप हंगामाच्या सुरूवातीला पावसाने सातत्यपूर्ण व दमदार हजेरी लावली. मात्र, तीन आठवड्यांपासून पावसाने ओढ दिली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये पुन्हा एकदा नैराश्याची लाट पसरली आहे. आठवडाभरात झालेल्या ११ शेतकऱ्यांनी मृत्यूला कवटाळले असून, यापैकी बहुतांश जण ३० ते ४० वयोगटातील आहेत.मागील आठ महिन्यात आत्महत्या करणाऱ्या शेतकऱ्यांचा आकडा १५० च्या घरात पोहोचला आहे. तीन वर्षापासून दुष्काळात पिचलेल्या बळीराजाने जूनमध्ये उसनवारी करत पेरणी केली. बहरात आलेली पिके पुन्हा पावसाअभावी धोक्यात आली. एकदंरीत या प्रकारांमुळे शेतकरी आत्महत्येचे सत्र कायम आहे. जानेवारी ते आॅगस्ट २०१६ (आतापर्यंत) जिल्ह्यात एकूण १५० शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या आहेत. यापैकी ९३ आत्महत्या शासकीय मदतीसाठी पात्र आहेत. त्यांच्या कुटुंबीयांना प्रत्येक एक लाख रूपयांची मदत शासन देणार आहे तर पाच आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे आला असून याची पडताळणी होणार आहे. १७ प्रकरणांचा अहवालच प्राप्त झालेला नाही. (प्रतिनिधी)नापिकी व कर्जबाजारीपणा यामुळे आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या आत्महत्येनंतर तहसील, मंडळ अधिकारी यांच्या स्तरांवर आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या बाबतीत चौकशी केली जाते. यातून संबंधीत शेतकऱ्याने आत्महत्या केलेले कारण शोधून त्यानुसार अपात्र-पात्रतेची यादी बनविण्यात येते. दीडशे पैकी चक्क ३१ शेतकरी आत्महत्या अपात्र असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अहवालानुसार समोर आले आहे.
पाऊस लांबणीवर; शेतकऱ्यांत निराशा
By admin | Published: August 25, 2016 12:40 AM