लोकमत न्यूज नेटवर्कजालना/परतूर : तब्बल एकवीस दिवसानंतर परतूर, अंबड आणि जालना तालुक्यातील काही भागात शुक्रवारी दुपारी जोरदार पावसाने हजेरी लावली. मात्र, जिल्ह्याच्या उर्वरित भागात पावसाने हुलकावणी दिल्याने त्या भागांत दुबार पेरणीचे संकट कायम आहे.परतूर शहरासह परिसरात शुक्रवारी दुसऱ्या दिवशीही जोरदार पावसाने हजेरी लावली. हा पाऊस सर्वत्र नसला तरी, शहरासह अंबा, डोल्हारा, वरफळ, वाडी, मापेगाव, मसला आदी ठिकाणी सायंकाळी ४ च्या सुमारास या जोरदार पावसाने हजेरी लावली. निरभ्र आकाश, वाहणारा वारा पेरलेल्या पिकाचे भवितव्य टांगणीला, रखडलेल्या पेरण्या यामुळे शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. मात्र, दोन दिवसांपासून सर्वत्र नसला तरी, कुठे ना कुठे पाऊस हजेरी लावत असल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. शहर व परिसरात पाऊण तास पाऊस झाला. नाल्यातील पाणी रोडवर आल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण झाला होता.
पावसाची पुन्हा हुलकावणी
By admin | Published: July 08, 2017 12:30 AM