बीड : खरिपापाठोपाठ रबी पेरणीलाही पावसाने दगा दिला आहे. दोन दिवसांपासून अत्यल्प पाऊस सुरु आहे. मात्र, पिकांसाठी मोठ्या पावसाची आवश्यकता आहे.शनिवारी सकाळपासूनच जिल्ह्यात सर्वदूर ढगाळ वातावरण निर्माण झाले होते. त्यानंतर अतिशय हलक्या पावसाला सुरुवात झाली. दिवसभर या हलक्या थेंबांची बरसात सुरुच होती. दरम्यान, शनिवारी रात्रीही यात खंड पडला नाही. रविवारी दिवसभर कमी- अधिक प्रमाणात हलके थेंब कोसळत होते. माजलगाव, बीड, गेवराई, आष्टी, परळी, धारुर येथे पावसाने हजेरी लावली खरी;परंतु त्याला जोर नसल्याने ेशेतकऱ्यांत निराशा पसरली आहे. खरिपाची पिके कशीबशी तरली आहेत. पाण्यावाचून कापसू जागेवरच करपून चालला आहे. तुरीची वाढ खुंटली असून बाजरीलाही फटका आहे. मोठ्या पावसाची गरज असताना भूरभूर पावसावरच समाधान मानावे लागत आहे. (प्रतिनिधी)
परतीचा पाऊस कम‘जोर’
By admin | Published: October 26, 2014 11:37 PM