छत्रपती संभाजीनगर : पाऊस राज्यात धो-धो बरसत असला, तरी मराठवाड्याला मात्र पावसाने ‘खो’ दिला आहे. विभागातील आठ जिल्ह्यांत आजवर वार्षिक सरासरीच्या तुलनेत ५५ दिवसांत ५५.९ टक्के पाऊस झाला आहे. वार्षिक सरासरी ६७९.५ मिमी पाऊस पडतो. त्या तुलनेत आजवर ३८०.१ मिमी पाऊस विभागात झाला आहे. परंतु, पाणलोट क्षेत्रामध्ये दमदार पाऊस न झाल्यामुळे ७४९ लहान, ११ मोठे व मध्यम ७५ मिळून ८७७ प्रकल्प अद्यापही तहानलेलेच आहेत.
विभागात ५५.९ टक्के पाऊस सध्या झाल्याचे आकडे सांगत आहेत; परंतु वस्तुस्थिती पाहिली तर हा पाऊस पेरण्यांसाठी पूरक आणि धरणे भरण्याच्या दृष्टीने अपुरा आहे. गोदावरी नदीसह ११ नद्यांच्या पाणलोट क्षेत्रात कमी पाऊस झाल्याने नद्या प्रवाही झालेल्या नाहीत. परिणामी, प्रकल्प अद्यापही तळालाच आहेत. पावसाळ्याचे दोन महिने सरत आले असून, उर्वरित काळात पावसाने दडी मारली तर आगामी काळात पाणीटंचाईचा प्रश्न उभा राहणार आहे. मराठवाड्यात २४ जुलै रोजी सकाळपर्यंत १९.९ मि.मी. पाऊस झाला. यात लातूर जिल्ह्यात ३१.५ मि.मी., नांदेड जिल्ह्यात २८ मि.मी. पावसाची नोंद झाली. उर्वरित जिल्ह्यांत १ ते २० मि.मी. दरम्यान पावसाची नोंद झाली.
जिल्हानिहाय आतापर्यंत झालेला पाऊसछत्रपती संभाजीनगर ५९.२ टक्केजालना ५७.४ टक्केबीड ६६.८ टक्केलातूर ६१.२ टक्केधाराशिव ६५.५ टक्केनांदेड ४९.२ टक्केपरभणी ४८.७ टक्केहिंगोली ४७.०० टक्केएकूण : ५५.९ टक्के
पाऊस आणि पेरण्याची स्थितीमराठवाड्यात किती पाऊस? : ५५.९ टक्केवार्षिक सरासरी : ६७९.५ मिमीजूनपासून आजवर पाऊस : ३८०.१ मि.मी२४ जुलै रोजी सकाळपर्यंत पाऊस : १९.९ मिमीजुलै महिन्यात पाऊस १९६.८ मिमीपेरण्या किती : ९८ टक्के११ मोठ्या प्रकल्पांत जलसाठा: १७.३५ टक्के